महाराष्ट्र

Nana Patole : विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचेच काम केले

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मोदी सरकारवर टीका

Anil Deshmukh Issue : देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली आहे. जे लोक सरकार विरोधात असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले आहे. ईडीचा (ED) वापर केला. काही जण या कारवाईला घाबरून सत्तेत सोबत गेले. त्यांना क्लिनचिट मिळाली आहे. त्यामुळे अनिल देशमुख जे बोलले ते खरे असेल. एकनाथ शिंदे आणि टीम हे ईडीच्या रडारवर होते. वायकर सांगतात मी नाईलाजने शिंदे गटात आलो. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, याची कल्पना येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी या शब्दात सरकारवर टीका केली. नागपुरात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. तुम्हाला कोणी थांबवले. जनतेपुढे वस्तुस्थिती मांडली पाहिजे. ड्रग माफियांची जेलमध्ये फाइव्ह स्टार व्यवस्था आहे. गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी केला जात आहे. वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात पैसे आणू. राज्य गहाण ठेवले हे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होत आहे. समृद्धी महामार्गातून सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे. लोकांचे जीव जाण्यासाठी मार्ग बनला का? दोन वर्षांत रस्त्यावर भेगा पडल्या. लोकांचा या रस्त्यामुळे जात आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

कमाईसाठी स्पर्धा 

राज्यातील महायुतीच्या सकारवर पटोले यांनी भ्रष्टाचाराचेही आरोप केले. ते म्हणाले, कोण जास्त पैसे खाईल, याची स्पर्धा सत्ताधारी नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे सरकार महाभ्रष्ट युती सरकार आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती येत आहे. अनेक भागात पूर परिस्थिती आहे. रस्ते वाहून गेले आहेत. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे पण सरकारला त्याचे काहीच घेणेदेणे नाही. गेल्या अतिवृष्टीतील मदत अद्यापही लोकांना मिळालेली नाही. काही भागात अजिबातच पाऊस नाही. या भागातील शेतकरी अडचणीत आहे. पुरामुळेही शेतकरी अडचणीत आहे. पण सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांचे धोरण शेतकरी विरोधीच असल्याचे पटोले यांनी नमूद केले.

देशातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रात शिक्षक भरती नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शाळा बंद करण्याची वेळ अनेक संस्थांवर आली आहे. असे अनेक मुद्दे आहेत. परंतु या सगळ्या विषयांवरून लोकांच लक्ष भरकटविण्यासाठी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगत आहेत. सरकार कोणत्याही मुद्द्यावर विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर बोलायला तयार नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले सरकारच्या विरोधात 68 लोकांची टीम आहे. भाजपचा हा प्रयोग आहे. त्याचा अनुभव बावनकुळे यांना जास्त आहे. त्यामुळेच ते याबाबत सांगत आहेत. महायुतीमधील तीन नेत्यांचे तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. बवनकुळे म्हणाले दहा मुख्यमंत्री महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तयार झाले आहेत. पण बावनकुळे यांना आकडेही धड सांगता येत नाहीत. आघाडीत दहा नेतेच नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मदतकार्याला वेग हवा

राज्यातील अनेक भागात सध्या पूर परिस्थिती आहे. पुण्यात ‘एअर लिफ्ट’ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक व्यवस्था संपविण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. विकासाच्या नावावर निसर्गाचा ऱ्हास केला आहे. वनांना नष्ट केले आहे. घनदाट वृक्ष असलेला परिसर कापून काढला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पुराची परिस्थिती आहे. नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगलीत हेच चित्र आहे. लोक जागो की मरो याचे सरकारला काहीच देणेघेणे नाही. विकासाच्या नावावर आपला खिसा मात्र सरकार भरत असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!