Swearing : महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला येत्या 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. गुरुवार, दि. 5 डिसेंबरला दुपारी मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाई बैठकीद्वारे आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याचे कळते. त्यामुळे अद्याप मुख्यमंत्री कोण असणार, हे निश्चित नसले तरीही शपथविधीचा मुहूर्त मात्र निघाला आहे.
23 नोव्हेंबरला लागलेल्या निकालात पूर्ण बहूमत मिळूनही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये कुणाला कोणते खाते मिळणार, याबाबत निर्णय होऊ शकला नाही. विशेष म्हणजे भाजपचा गटनेता अद्याप जाहीर झालेला नसल्याने मुख्यमंत्रीपद कोणत्या भाजपनेत्याकडे जाईल, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यावर येत्या दोन दिवसांत मार्ग निघेल आणि 3 डिसेंबरला किंवा त्यापूर्वीच भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाईल. त्यासाठी महाराष्ट्राचे निरीक्षक मुंबईत दाखल होणार आहेत.
5 डिसेंबरचा आझाद मैदानावरील शपथविधी भव्यदिव्य करण्यासाठी हजारो लोकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री व महायुतीचे खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शपथविधी सोहळ्यासाठी विशेष पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात ज्यांची वर्णी लागेल त्यांच्या नातेवाईकांनाही या सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे.
Eknath Shinde : जेव्हा शिंदे गावी जातात, तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात !
मुख्यमंत्री कोण होणार?
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहूमत मिळालं. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पुन्हा जबाबदारी सोपवली जाणार आहे, अशी चर्चा आहे. पण, भाजपमधील वरीष्ठ नेत्यांनी अद्याप तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.