Maharashtra Cabinet : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर काल (21 डिसेंबर) रात्री उशिरा जाहीर झालं. यात फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडंच ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर काल अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये रविवारी (15 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांनाही खाती वाटप करण्यात आली.
खातेवाटप
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर काल (21 डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे.
Mahayuti : एकनाथ शिंदे स्वयं-पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच घर देणार !
मंत्रिमंडळ –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. त्याचबरोबर ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यांसह इतर शिल्लक खाती त्यांच्याकडे असतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम) खाते असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार : अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खात्यांचा कारभार असेल
चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
गिरीश गीता दत्तात्रय महाजन – जलसंपदा (विदर्भ तापी कोकण)
गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील – पाणीपुरवठा, स्वच्छता
गणेश रामचंद्र नाईक – वनमंत्री
दादाजी रेश्माबाई दगडू भुसे – शालेय शिक्षण
संजय प्रमिला धुलीचंद राठोड – जल आणि मृदा संवर्धन
धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे – अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा – कौशल्यविकास आणि रोजगार
उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
जयकुमार रावल – विपणन आणि राजशिष्टाचार
पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे – पर्यावरण आणि पशूसंवर्धन
अतुल लीलावती मोरेश्वर सावे – ओबीसी कल्याण, दुग्धउत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा
अशोक जनाबाई रामाजी उईके – आदिवासी विकास
शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई – पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण
आशिष मीनल बाबाजी शेलार – माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य
दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे – क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग
आदिती वरदा सुनील तटकरे – महिला व बालकल्याण
शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे – कृषी
जयकुमार कमल भगवानराव गोरे – ग्रामीण विकास आणि पंचायती राज
नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सुशीला वामन सावकारे – वस्त्रोद्योग
संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक – परिवहन
भरत विठाबाई मारुती गोगावले – रोजगार हमी
मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील – मदत आणि पुनर्वसन
नितेश नीलम नारायण राणे – मत्स्यपालन आणि बंदरे
आकाश सुनिता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर – श्रमविभाग
बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील – सहकार
प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – सामाजिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण
राज्यमंत्री
माधुरी मीरा सतीश मिसाळ – नागरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग व औकाफ
आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल – अर्थ, नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी आणि न्याय तसेच श्रम
पंकज कांचन राजेश भोयर – गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर – सामाजिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला-बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम
इंद्रनील अनिता मनोहर नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण
योगेश ज्योती रामदास कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायती राज, अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग.