महाराष्ट्र

Assembly Election : भाजपाची निवडणूक आयोगात धाव

MLA Ashish Shelar : नेत्यांनी थेट गाठली दिल्ली

Question Of Each Vote : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला होता. अनेकांची नावे यादीतून गहाळ झाली होती. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात भाजपला बसला. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत अनेकांना मतदान करता आले नाही. त्यामुळे भाजप सध्या मतदार याद्यांबाबत खूपच गंभीर झाली आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

2019 मधील निवडणूकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती. ती 2024 मधील निवडणूकीत कशी गहाळ झाली? का गहाळ झाली? कोणाच्या आदेशानी झाली? याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, हेमंत वणगा, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात राजीव कुमार यांच्याशी चर्चा केली. सुमारे एकतास ही बैठक चालली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.

मुदतीत वाढ

महाराष्ट्रात सध्या मतदान नोंदणी अभिमान सुरू आहे. त्यातील त्रुटी आणि काही महत्त्वाचे मुद्दे शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (Chief Election Commissioner) निदर्शनास आणून दिले. अभियानामध्ये नव्याने नोंदणी करताना मतदाराचे फोटो, पत्ता, नाव यात येणाऱ्या काही तांत्रिक अडचणीही लक्षात आणून देण्यात आल्या. याबाबत आमदार शेलार म्हणाले की, मुंबईतील जवळजवळ 1 हजार 100 गृहनिर्माण सोसायटीमध्ये बुथ निर्मिती होत आहे. 25 जुलैपर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी विनंती आयोगाला केली आहे. त्यानुसार आयोगाने सात दिवस मतदार नोंदणी अभियानात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्याची मुदतही सात दिवस पुढे ढकलण्यात येईल. आता 2 ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे.

आयोगाने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदार यादी जाहीर केली होती. त्यातीन अनेक मतदारांची नावे 2024 मधील निवडणुकीत गहाळ झाली आहेत. त्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. मतदारांची नावे कशी गायब झाली, याची चौकशी गरजेची असल्याचे शेलार म्हणाले. यादीतून नाव गहाळ झालेल्या सर्व मतदारांना पुन्हा यादीत सामावून घेण्यासाठी आयोगाने लक्ष द्यावे, अशी विनंती करण्यात आली. त्याबद्दल आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शेलार यांनी सांगितले. मतदारांनी आपले नाव यादीमध्ये बिनचूक कसे नोंदले जाईल, ओळखपत्र, फोटो बिनचूक कसे येतील याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही शेलार यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!