Home to home Promotion : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी आता केवळ काहीच तास उरले आहेत. सोमवार, दि. १८ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यानंतर सभा, रॅली किंवा होम टू होम प्रचार करता येणार नाही. प्रचार करताना कुणी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना निवडणूक प्रशासनाने केली आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
प्रशासनाकडून जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होतील.सात विधानसभा मतदारसंघांत एकूण मतदार सुमारे २१ लाख २४ हजार २२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ११ लक्ष ०५ हजार १९३, महिला मतदार १० लक्ष १८ हजार ९९६ तर तृतीयपंथी मतदार ३८ आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. तसेच
जिल्हास्तरीय समितीची स्थापना
विधानसभा निवडणूक काळात जप्त केलेल्या रोख रकमेवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, खर्च सनियंत्रक नोडल अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी या तीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
निवडणुकीच्या गप्पा पारावर
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर, पारावर निवडणुकीच्या गप्पांचा फड रंगताना दिसत आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सर्वत्रच चालू आहे. या निवडणुकीत गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर तसेच उसाच्या फडात, पारावर गप्पांचा फड रंगताना दिसत आहे. यामध्ये जुने जाणते व नवीन तरुणांचा गप्पांचा फड चांगलाच रंगताना दिसत आहे. यामध्ये जुने लोक जुनी प्रचाराची पद्धती, कसा प्रचार करत होतो. प्रचारासाठी कसे जात होतो. जुने अनुभव सांगताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर प्रचार सुरू राहणार
तरुणाई सध्या डिजिटल युगात मोबाइल किंवा इतर बाबींचा प्रचारासाठी प्रभावीपणे कसा वापर केला जातो, हे सांगत आहे. रात्रीच्या वेळी हे गप्पांचा फड रंगत आहेत. तसेच, उमेदवार यांचा दौरा कुठे आहे. हेही सांगत आहेत, तसेच निवडून कोण येईल, याचे तर्क वितर्क काढले जात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे.