Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला जाऊन आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आली. यानुसार महायुतीत राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 243 जागांवरील तिढा सुटला असल्याची माहिती समोर येत आहे.
तोच.. मुख्यमंत्री
ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री, असा फार्म्युला ठरल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महायुतीत सन्मानपुर्वक जागा देण्यात याव्या, अशी मागणी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने केली आहे. राज्यातील काही मतदारसंघांवरून वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. यात 243 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरीत 32 जागांवर देखील चर्चा झाली आहे. आता मुंबईत तिन्ही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर जागावाटप करण्यात येईल, असेही सूत्र सांगतात.
मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठी घासाघिस सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असेल, आमदारांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री पद ठरवलं जाणार, असे अमित शाह यांनी स्पष्ट केल्याचीही माहिती आहे.
आत्रामांनी दिला दुजोरा
ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचाच मुख्यमंत्रीही असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकतेच व्यक्त केले होते. महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवारांच्या विधानाचे समर्थन करताना ते म्हणाले की, शरद पवारांनी अजित पवारांना बाजूला ठेवण्याचे काम केले.
Assembly Election : ‘काकांचा’ पुतण्याला आणखी मोठा धक्का, दादा गटाला खिंडार !
पवार गटाची तयारी..
अजित पवार यांना त्यांच्या घरातच मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सर्व जागांवर तयारी केली आहे. महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी करण्यात येणार आहे. गुरुवारी आत्राम यांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ते म्हणाले, अजित पवार यांच्याकडे सक्षम नेतृत्व क्षमता आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असंही आत्राम यांनी सांगितलं.