Political War : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोदी आणि मोदी सरकार आवडत नाही, तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रातील सर्व योजनांचा विल्हेवाट लावून विकास कामे अडकतील असे बावनकुळे म्हणाले.
वक्फ बोर्डाने मोठ्या प्रमाणात जमिनी अतिक्रमित केल्या आहेत. हिंदूंच्या, मागासवर्गीयांच्या, आदिवासींच्या जमिनी वर्क बोर्डाने त्यांच्या नावावर करून घेतल्या आहेत. त्या जमिनी ज्यांच्या मालकीच्या आहेत, त्यांना परत मिळाव्या. याकरिता रेकॉर्ड दुरुस्त करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. यासाठी लागणारा पैसा सरकारने खर्च करावा. यामध्ये मंदिराच्या जमिनी, खाजगी मालकीच्या, आदिवासींच्या जमिनी आहेत. त्या जमिनी परत देणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात परस्पर जमिनी वक्फ बोर्डात लागलेल्या आहे. त्या परत मिळाल्या पाहिजे, यावर लवकरात लवकर निराकरण करावे, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना मिळालेली मतं ही मुस्लिमांची आणि मराठ्यांची आहे यावर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधत टोला लावला आता तरी जातीपातीचे राजकारण सोडा. उद्धव ठाकरे यांना 51 टक्के मिळालेली मत ही मुस्लिमांची आहेत आणि हे बूथवरून सिद्ध झालं आहे. ईव्हीएम मशीनवर ज्याद्वारे मतदान झालं आहे, त्यावरून कळतं की उध्दव ठाकरे यांनी दोन वर्षापासून स्वीकारलेल्या हिंदूविरोधी भूमिकेवरून त्यांना मतं मिळाली आहेत. या बाबीचा अभिमान जर उद्धवजींना वाटत असेल, त्यांचा त्यांना लखलाभ आहे. परंतु बाळासाहेब ठाकरे जर पाहत असतील तर त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल. खरंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत केलेला हा दगाफटका आहे.
शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात…
शरद पवारांवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, दंगली घडविण्याचे काम हे शरद पवारांनी केले आहेत आणि त्यांचा अजेंडा सुद्धा हाच आहे. भारतीय जनता पार्टी कधीच हे करणार नाही आणि आमच्या काळात दंगली घडवण्याचे काम कधीच होणार नाही. जातीपातीचे राजकारण करू नका हे जास्त दिवस चालणार नाही. जातीपातीच्या नावावर निवडणूक जिंकली असेल, तरी ती जास्त दिवस टिकणार नाही. अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पोस्टर वॉर वरून नितेश राणे आणि उदय सामंत यांना उद्देशून बावनकुळे म्हणाले की, आमची तुम्हाला विनंती आहे की या प्रकारे बोलणे, वक्तत्व करणे योग्य नाही, वादविवाद नको. आपले सरकार विकासाच्या रस्त्यावर चालणारे आहे. आपण उद्दिष्टांसाठी काम करत आहोत. मोदी सरकारची विकास कामे समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचवणं, हे आपले ध्येय आहे. मोदी सरकार विकासाकडे वळत आहे, या गोष्टीचा विचार करा. जर पुन्हा असे घडले, तर यावर विचार केला जाईल.
थोड्याशा विजयाने विरोधक हुरहुरले..
थोड्याशा यशाने मंत्री हुरहुरून गेले आहे. निवडणुकीत फक्त पॉईंट 3 टक्के इतका फरक पडला आहे. या फरकामुळे मुख्यमंत्री पद मिळविण्याकरिता विरोधक उत्साहात आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विकास पोहोचवावा, म्हणून आमचे सरकार महत्त्वाचे आहे. राज्यात चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले तर महाराष्ट्राला बंद पाडतील. आयुष्मान योजना, अन्नसुरक्षा योजना, किसान योजना बंद पाडतील, हा त्यांचा अजेंडाच बनलेला आहे. जात-पात एवढेच राजकारण करून महाविकास आघाडीने मतदान मागितले, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसने तर महिलांना साडेआठ हजार खटाखट प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला देऊ, असे आवाहन दिले होते. लोक काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर रांगा लावून उभे राहतात, तरीही त्यांचे पैसे खटाखट खटाखट येत नाहीत. खोटे बोलून महाविकास आघाडीने मतदान मागितले आहेत, हे जास्त काळ चालणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.