महाराष्ट्र

Assembly Election : ‘द लोकहित’चे वृत्त तंतोतत खरे ठरले; येरावार, उईके, सावरकर यांना संधी 

Maharashtra BJP : पहिल्या यादीमध्ये 99 जणांचा समावेश 

Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांबाबत ‘द लोकहित’ने आपल्या वृत्तात दिलेली नावे जशीच्या तशी खरी ठरली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून मदन येरावार, अशोक उईके यांना पुन्हा संधी देण्यात येईल, असे वृत्त ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. याशिवाय अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून रणधीर सावरकर यांनाच उमेदवारी मिळेल, असेही सगळ्यात पहिले ‘द लोकहित’ने ठामपणे नमूद केले होते. 

पहिली यादी जाहीर

भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी (20 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मदन येरावार, अशोक उईके आणि रणधीर सावरकर यांची नावे आहेत. विदर्भाचा विचार केल्यास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून श्वेता महाले यांना संधी देण्यात आली आहे. खामगावमधून विद्यमान आमदार आकाश फुंडकर हेच भाजपचे उमेदवार असतील. देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय व्यक्तींपैकी एक असलेले आमदार संजय कुटे यांना पुन्हा एकदा जळगाव जामोद मधून संधी देण्यात आली आहे.

पुन्हा संधी 

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड हे पुन्हा एकदा भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. प्रवीण तायडे यांना अचलपूर मधून उमेदवारी मिळाली आहे. देवळी मतदारसंघातून राजेश बकाने हेच भाजपचे उमेदवार आहेत. हिंगणघाट मतदार संघाचे विद्यमान आमदार समीर कोणावर यांनाही भाजपने पुन्हा मैदानात आणले आहे. वर्धा येथील 47 वर्षीय आमदार पंकज भोयर हे पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनाही भाजपने संधी दिली आहे.

Yavatmal Politics : येरावार, राठोड,  नाईक, उईकेंचं भवितव्य ठरलं

 ‘द लोकहित’ने वृत्त प्रकाशित

दत्ता मेघे यांच्या सुपुत्र समीर मेघे हे सध्या हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे नावही याच मतदारसंघासाठी उमेदवारांच्या यादीत आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघातून विजय राहंडाले हे आपलं भाग्य आजमावणार आहेत. त्यांनाही भाजपने संधी दिली आहे. गोंदियातून विनोद अग्रवाल आणि आमगाव मधून संजय पुराम हे भाजपचे उमेदवार असतील. कृष्णा गजबे यांना आरमोरीतून उमेदवार करण्यात आले आहे. चिमूर मतदारसंघातून बंटी भांगडिया यांना संधी देण्यात आली आहे. संजीव रेड्डी बोधक गुरुवार हे वणीतून भाजपचे उमेदवार असतील. रायगाव आणि यवतमाळमधून ‘द लोकहित’ने वृत्त प्रकाशित केल्याप्रमाणे मदन इरावार आणि अशोक उईके हे भाजपचे उमेदवार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!