भारतात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय लष्करालाही नवे प्रमुख मिळाले आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना भारतीय लष्कराचे नवे लष्करप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. उपेंद्र द्विवेदी 30 जूनच्या दुपारपासून भारतीय लष्कराची कमान सांभाळतील. भारताचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. उपेंद्र द्विवेदी त्यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी पीव्हीएसएम, एव्हीएसएम,सध्या भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम करतात. द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त झाल्यानंतर सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांची जागा घेतील. उपेंद्र द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि तीन GOC-in-C प्रसंशापत्रे प्रदान करण्यात आली आहेत.
मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. 1964 मध्ये जन्मलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या इन्फंट्री रेजिमेंट जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांच्या 40 वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांच्या कमांडच्या नियुक्त्यांमध्ये कमांड ऑफ रेजिमेंट (18 जम्मू आणि काश्मीर रायफल्स), ब्रिगेड (26 सेक्टर आसाम रायफल्स), डीआयजी, आसाम रायफल्स (पूर्व) आणि 9 कॉर्प्स यांचा समावेश आहे, असे सरकारी प्रकाशनाने मंगळवारी सांगितले.
विविध क्षेत्रात बजावली सेवा
01 जुलै 1964 रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या पायदळ (जम्मू आणि काश्मीर रायफल्स) मध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांच्या सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी विविध क्षेत्रात सेवा बजावली आहे. कमांडलेफ्टनंट जनरल द्विवेदींच्या कमांड नियुक्तींमध्ये कमांड ऑफ रेजिमेंट (18 जम्मू आणि काश्मीर रायफल्स), ब्रिगेड (26 सेक्टर आसाम रायफल्स), महानिरीक्षक, आसाम रायफल्स (पूर्व) आणि 9 कॉर्प्सचा समावेश आहे.
पांडे यांची एक महिना अतिरिक्त सेवा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे यांच्या नियुक्तीला महिनाभराची मुदतवाढ मंजूर केली आहे. लष्करी नियम 1954 च्या नियमांतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज सी पांडे 31 मे 2024 रोजी सेवा निवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली होती. पुढील लष्करप्रमुख (सीओएएस) कोण असतील याची सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आता उपेंद्र द्विवेदी यांच्यावर नावावर मोहोर उमटविली गेली आहे.