महाराष्ट्र

Lok Sabha Election : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबला

Election campaign : गडगडणाऱ्या तोफा झाल्या शांत

Buldhana constituency : गेल्या काही दिवसांपासून रणरणत्या उन्हात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठीचा सुरू असलेला जोरदार प्रचार बुधवारी संध्याकाळी थांबला. येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्य्यामध्ये देशातील 89 तर महाराष्ट्रातील 8 जागांवर मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करीत आहेत. अखेरच्या टप्प्यात जाहीर प्रचारात आघाडी घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. आता प्रचार तोफा थंडावल्याने स्थानिक पुढाऱ्यांनाच किल्ला लढवावा लागणार आहे. ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला जाणार आहे.

आता केवळ गृहभेटीवर भर!

बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर केवळ गृहभेटी देता येतील. त्यातही पाचपेक्षा अधिक व्यक्ती प्रचार करू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांनाच ठिकठिकाणी किल्ला लढवावा लागणार असून, प्रचाराची राहिलेली कसर भरून काढून आघाडी मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

Lok Sabha Election : दोन महिन्यांपासून नियोजन तरी, मतदारांचे याद्यांत नाव सापडेना!

शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात मात्र राजकीय पक्षांपेक्षा अपक्षांचा जास्त बोलबाला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांची प्रचार पद्धती आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता चौरंगी लढत सध्या तरी दिसून येत आहे.

error: Content is protected !!