Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे राहिले असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ मांडणीच्या भाकितांवर बंधने आली आहेत. आचारसंहिता लागू असल्याने 2 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
निवडणूक पाच टप्प्यात होत आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी, चौथा टप्पा 13 मे रोजी आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असले तरी दरवर्षी देशाचा राजा आणि राजकारणाबाबत जाहीर होणारी भेंडवळच्या भविष्यवाणी मध्ये यावेळेस राजकीय भविष्यवाणी जाहीर होणार नाही. हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
370 वर्षांचा इतिहास
370 वर्षांचा इतिहास असलेली भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतियेच्या सायंकाळी केली जाणार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे हंगामाच्या दृष्टीने पीक, पाणी, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितींबाबत या घटमांडणीद्वारे अंदाज व्यक्त केले जातात. ही मांडणी पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शेतकरी येत असतात. भेंडवळला लागून असलेल्या शेतात एका गोल घटात मांडणी केली जाते. त्यानंतर शनिवारी सूर्योदयाच्या वेळी मांडणीची पाहणी करून चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज वाघ भाकिते जाहीर करतील.
Maharashtra Lok Sabha Election : बुलढाण्यात एकाच वेळी 84 टेबलवर मतमोजणी
आचारसंहितेमुळे बंधने
यंदाच्या घट मांडणीत राजकीय भाकिते वर्तविली जाणार नाही. त्याचे कारण म्हणजे देशात असलेली आचारसंहिता. भेंडवळच्या भाकितामध्ये
राजा कायम आहे की नाही, देशाची आर्थिक स्थिती कशी राहील ? देशाच्या राजावरील ताण राहणार आहे का? शिवाय परकीयांची घुसखोरी बाबत भविष्यवाणी केली जाते. मात्र, या सर्व बाबी यावेळेस ऐकावयास मिळणार नाही. आचारसंहिता सुरु आहे. निवडणुकांपूर्वी राजकारणाबाबत सांगणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज वाघ या याबाबत वक्तव्य करणार नसल्याचे समजते.
2 जूनला जाहीर करणार राजकीय भाकीत ?
लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. 1 जून पूर्वी निवडणुकीच्या परिणामावर कुठलेही प्रभाव पडणाऱ्या विषयावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. त्यामुळे शारंगधर महाराज वाघ हे राजकीय विषयांचे भाकित 2 जून रोजी जाहीर करणार असलयाचे संकेत प्राप्त झाले आहेत.