संपादकीय

Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीतून विधानसभेचा वेध

Maharashtra Politics :  इच्छुकांच्या हालचालींना वेग

Anxious moment : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान आटोपले. परंतु काही इच्छुकांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीचा वेध घ्यायला आतापासूनच सुरुवात केली आहे. अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी फिल्डिंग लावली जात आहे. 

या लोकसभा निवडणुकीतून इच्छुकांनी स्वतःला प्रोजेक्ट करण्याची एकही संधी सोडली नाही हे दिसून आले. कारण मिळालेल्या संधीचे जो सोने करतो तोच स्पर्धेत टिकतो याचे भान राजकीय नेत्यांना राहते. आणि निवडणूक त्यांच्या साठी सत्तासोपान गाठण्याचा मार्ग असतो.

केंद्रीय नेते प्रचाराला आले की त्यांचे स्वागत करणे, त्यांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणे आणि हळूच आपली उमेदवारी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होतो. राजकारणाच्या सारीपटावर अनंत चाली चालाव्या लागतात. कारण यश सहज मिळत नाही याची जाणीव त्यांना असते. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी देखील खेळी खेळली जाते.

पोट निवडणुकीसाठी अनेक समोर आले

अकोला पश्चिम मतदारसंघात सलग सहा वेळा निवडून आलेले गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक होणार होती. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार ती रद्द झाली ही गोष्ट वेगळी. परंतु त्यासाठी अनेक नवीन चेहरे समोर आले होते. पक्षात आम्ही सतरंज्या उचलायच्या का असा प्रश्न काहींनी उपस्थित केला होता. पुढे जेव्हा निवडणूक होईल तेव्हा स्पर्धा दिसेलच.

काहींना हवी मनपा निवडणूक

माजी नगरसेवक आणि संभाव्य नगरसेवक दोघेही अस्वस्थ आहेत. महापालिका निवडणूक कधी होते आणि नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळते ही प्रतिक्षा आहे. कारण अकोला महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ही निवडणूक लवकर व्हावी अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!