महाराष्ट्र

Lok Sabha Election : ओढून ताणून पुन्हा 54 टक्केच मतदान

East vidarbh voting : नागपूरसह पाच मतदारसंघात मतदान

East vidarbh voting :  राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.85 टक्के मतदान झाले.

आज 19 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – रामटेक  52.38 टक्के, नागपूर 47.91 टक्के, भंडारा- गोंदिया 56.87 टक्के, गडचिरोली- चिमूर 64.95 टक्के आणि चंद्रपूर 55.11 टक्के आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले.

2133 मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये  तुमसर 58.94, भंडारा 56.79, साकोली-58.79, अर्जुनी  मोरगाव -53.2, तिरोडा- 56.69, गोंदिया 56.11 असे मतदान झाले.

मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. यामध्ये नव मतदार तसेच विशेष मतदान केंद्रावर महिला व दिव्यांग यांनी देखील उत्साहात मतदान केले. रणरणत्या उन्हातही महिला, पुरुष, युवक, युवतींचा समावेश होता. विविध मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात ब-यापैकी मतदार दिसून आले.

तप्त उन्हाचा तडाखा पाहता मतदान केंद्रावर शेड, पाणी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. तसेच मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात व्हावे यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही केंद्रावर निवडणूक निरीक्षकांनी पाहणी केली.

Lok Sabha Election : कोणी कुठे केले मतदान जाणून घेतले का?

किरकोळ वाद झाले

नागपूर, चंद्रपूर मतदान केंद्रावर भाजप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाले परंतु ते लगेच निवळले देखील. त्या व्यतिरिक्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली अशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!