Political War : सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भविष्यवाणी केली.केंद्रात इंडीया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी इंडीया आघाडीच्या सर्व राज्यांतील जागा मोजल्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा दावा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून हे दिसून येते की, पक्ष पुढे आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळी धोरणे घेऊन निवडणुका झाल्या आहेत. जनतेने मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आणि आज आपण भाजपच्या पुढे आहोत, आमची संपूर्ण युती एकत्र आहे आणि संपूर्ण आघाडी चांगले काम करत आहे. यावरून मोदी आणि त्यांच्या पक्षाचे लोक निराश झाल्याचे दिसून येते.
273 पेक्षा जास्त जागा मिळतील.. कर्नाटकात 15 पेक्षा जास्त जागा जिंकू . केरळमध्ये आम्ही आधीच पुढे आहोत. हरियाणात 8-10 जागा मिळतील इथे किमान 8 जागा जिंकल्या जातील. राजस्थान मध्येही 10 जागा येत आहेत. महाराष्ट्रातही आम्ही 30 च्या वर राहू असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी ध्यान केले आज ते पुर्ण झाले यावर कोणती तक्रार नाही. निवडणुकीच्या काळात आज मतदान सुरू असून ते तिथेच बसले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष तिकडे वेधले गेले. त्यांनी याला प्रसिद्धीचा मुद्दा बनवला. तो ध्यानस्थ असताना तिथे माध्यमांची काय गरज आहे. मला वाटते ते पश्चाताप करायला बसले आहेत.
यूपी-बिहारबाबत..
यूपी-बिहारबाबत त्यांनी आपले मत सांगितले, ‘गेल्या वेळी जिथे आम्ही कमकुवत होतो, तिथे आम्ही वर येत आहोत. यूपीमध्येही आम्ही निवडणूक योग्य पद्धतीने लढवली, त्यामुळेच आम्हाला तिथेही चांगल्या जागा मिळत आहेत. अखिलेश यादव याचसोबत आम्हाला 30-35 जागा मिळत आहेत. मोदींवर निशाणा साधत निशाणा साधत ते बोलत होते.