महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : केंद्र, राज्यात एकाच विचाराचे सरकार फायदेशीर

Shiv Sena : उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राचे नुकसान

Political War : केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असले की ते फायद्याचे असते. केंद्रातून येणारा निधी राज्य सरकार देखील जनतेच्या हितासाठी खर्ची करतो. त्यामुळे केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार हे जनतेसाठी जास्त फायदेशीर असते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना आणण्याचा प्रयत्न केला. पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कधी चर्चाच होऊ दिली नाही, असा आरोप बावनकुळेंनी केला. उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या एका विश्लेषणात्मक बैठकीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली. बैठकीत त्यांनी सरकारच्या योजनांना शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला. विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा केली. सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यात त्यांनी काही निकष लावले गेले.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

ज्या ठिकाणी कमी आहोत, तिथे पुन्हा काम करणार आणि अजून चांगले काम करून जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी महाविकास आघाडी खोटारडेपणा करीत असून जनतेला फसवणूक करीत असल्याची टिका केली. महाविकास आघाडी सरकार आल्यास केंद्राच्या योजनांचा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे जनतेचे नुकसान होते, असे ते म्हणाले.

मराठ्यांवर अन्याय होणार नाही

मराठा आरक्षणावर देखील त्यांनी भाष्य केले. मराठ्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. बावनकुळे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर चर्चा झालेली नाही असे स्पष्ट केले. त्यांनी असेही नमूद केले की, मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न केला

 

Maharashtra Sadan : काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनसाठी सरकारकडून जमीन खरेदी

परंतू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्याशी कधीही चर्चा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले. केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असले की जनतेला जास्त फायदा होतो. बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला की मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारची डबल इंजिन सरकार जनतेला अधिक फायदा करून देईल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!