महाराष्ट्र

BJP : फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी राहू द्या : अनिल देशमुख

Anil Deshmukh : अनेकांच्या भूवया उंचावल्या

Political News : राजकाराणात एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप हे नेहमीचेच. यावेळी तर पक्षातील फोडाफोडी आणि नेत्यांची आयात निर्यात हे देखील नित्याचेच झाले. अशात आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या ‘खेळी’मुळे राज्यातून महाविकास आघाडीला सरकार गमवावे लागले. पुढे अनेक राजकीय भूकंप झालीत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अनिल देशमुख हे शरद पवारांच्या सोबत कायम राहिले. अशात त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी राहू द्या, असे विधान केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केल्याबाबतही विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, ‘मी मी त्यांच्या वरिष्ठांना विनंती करेल की त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहू द्या.’ या विधानाने आधी अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी फडणवीसांना हा मिस्कील टोला लगावला होता. अनिल देशमुख पुढे देवेंद्र फडणवीस जेवढे दिवस उपमुख्यमंत्री पदावर राहतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असेही म्हणाले. कापूस सोयाबीन संत्रा बेरोजगारी महागाई या सगळ्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणून ते जेवढे दिवस उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील तेवढा आम्हाला राजकीय फायदा होणार असल्याचा टोला त्यांनी लावला.

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण केल. ते जनतेला आवडले नाही. म्हणून लोकसभेत पराभव झाला. त्यामुळे आता विधानसभेत काय होते ते पाहू, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पोलिस भरती लवकर व्हावी

अनेक तरुण कित्येक महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. सध्या पावसामुळे भरती घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शासन त्यांच्या स्तरावर बदल करेल. भरती पुढे ढकलायची की नाही याबद्दलचा निर्णय कमिटी आहे. पण महाराष्ट्रात पोलिस भरती लवकर व्हावी, अशी इच्छा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. असेही ते म्हणाले.

मराठांच्या आरक्षणाला विरोध नाही पण..

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर उत्तर देताना त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसल्याचे सांगितले. पण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये एवढीच मागणी आहे. सरकारने योग्य समन्वय साधून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीने निर्णय घ्यावा, असा सल्लाही देशमुखांनी दिला.

Caste Census : विजय वडेट्टीवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

‘त्या’ प्रकरणाबद्दल माहित नाही

अकोला येथे दौऱ्यावर असताना नाना पटोलेंचे चिखलाने भरलेले पाय एक व्यक्ती धूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी राजकारणही चांगलेच तापले आहे. अशात या प्रकरणाबद्दल देशमुखांना विचारले असता त्यांनी त्याबद्दल माहित नसल्याचे उत्तर दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!