महाराष्ट्र

Akola BJP : संतापामुळे प्रचारातून माजी नगरसेवक गायब

Assembly Election : बोटावर मोजण्या इतके लोकच हातात झेंडे घेऊन 

Too Much Anger : भारतीय जनता पार्टीने अकोल्यामध्ये जनतेच्या इच्छेविरुद्ध जात उमेदवार दिल्याचा फटका आता प्रचाराला बसला आहे. अनेक वर्ष महापालिकेत सत्ता असताना देखील भाजपच्या प्रचारातून सगळेच माजी नगरसेवक गायब झाले आहेत. भाजपवरील संतापामुळे बोटावर मोजण्याइतके लोकच प्रचारामध्ये झेंडे घेऊन फिरताना दिसत आहेत. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा बराच अपमान करण्यात आला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात लालाजींचे सगळेच समर्थक शांत बसून आहेत. 

‘लालाजी गेले. आता तुमची चलती संपली’, असे टोमणे लालाजींच्या समर्थकांना भाजपकडून मारण्यात आलेत. त्यामुळे लालाजींचे जवळपास सगळेच समर्थक मनातून दुखावले. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेची निवडणूक झाली तरी आपल्याला कोणीही विचारणार नाही, हे लालाजींच्या कट्टर समर्थकांना आता लक्षात आले आहे. अकोला भाजपमधील अनेकांना अत्यंत पद्धतशीरपणे बाजूला काढून फेकण्यात आले. हे करताना ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’ याच शब्दांचा वापर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारातून काढता पाय घेतला आहे.

केवळ दिखावा 

दिवाळीनंतर खरंतर सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू झाला आहे. भाजपचा प्रचार हा एकेकाळी आहे अकोल्यामध्ये जोश आणि जान आणायचा. प्रचार रॅली, सभा आदींमुळे अकोला दणाणून जायचे. परंतु आता अकोला भाजपमध्ये अवकळा आली आहे. काही ठराविक नेत्यांनी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना बैठक, कार्यक्रम, विमानतळावर होणारे नेत्यांचे स्वागत अशा प्रसंगात हात धरून बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर अकोल्यात भाजपचे कमळ कोमेजत गेले. विशेष म्हणजे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला हे सर्व ठाऊक असतानाही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपला अनेकांच्या हाता पाया पडावे लागत आहे.

Maharashtra BJP : विदर्भातील बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

संघाच्या विरोधात जात भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे स्वयंसेवकांमध्येही प्रचंड नाराजी आहे. या परिस्थितीमध्येही संघ जर भाजपचा साथ देत असेल तर भाजप समोर संघ हतबल झाला, असाच संदेश जाणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघाला मत द्यायचे झाल्यास अनेक उमेदवार अकोल्यात आहेत. परंतु लोकांच्या मनात नसलेल्या उमेदवाराला जर संघ मतदान करायला लावत असेल तर भाजपच्या दबावाला संघ बळी पडला असेच म्हणावी लागेल, अशी चर्चा संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेकांच्या विरोधात जात भाजपने उमेदवारी जाहीर केली. आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. विदर्भातील भाजपचा गड अक्षरश: कोसळला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तरी भाजप शहाणी होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु यंदाही उमेदवारी देताना भाजपच्या नेत्यांनी हेकेखोरी कायम ठेवली आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या अनेकांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपला स्वतःच्या हातूनच महाराष्ट्रातील सत्ता गमवायची आहे, असाच संदेश आता लोकांमध्ये जात आहे. त्यातच अकोल्याच्या प्रचारमधून गायब झालेले निष्ठावंत हे बराच मोठा संदेश देऊन गेले आहेत. त्यामुळे अकोल्यात भाजपजवळ धनशक्ती आहे पण निष्ठावान कार्यकर्त्यांची शक्ती नाही असे चित्र आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!