प्रशासन

Chandrapur MSRTC : निकृष्ट दर्जामुळे नव्हे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने गळती

Bus Stand : एसटी महामंडळाने समोर आणली वास्तविकता

Rain Water : चंद्रपूर येथील बस स्थानकात झालेल्या पाण्याच्या गळतीबाबतची वस्तुस्थिती आधारित माहिती आता पुढे आली आहे. बस स्थानकात पावसाचे पाणी गळल्यानंतर यासंदर्भात अपप्रचार सुरू झाला होता. बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एसटी महामंडळाला आरोपीच्या पिंजऱ्या उभे करण्यात आले होते. मात्र दुरूस्तीचे काम सुरू असताना छत उघडण्यात आले आणि त्याचवेळी नेमका मुसळधार पाऊस आला. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे आता उघडकीस आले आहे.

नवीन बस स्थानकाचे काम दर्जेदारच आहे, असा एसटी महामंडळाचा दावा आहे. यासंदर्भात एसटीच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय घडले, याचा तपशिल पुराव्यांसह जाहीर केला आहे. चंद्रपुरातील नवीन बस स्थानकावरील बांधकाम अद्यापही सुरूच आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तळमजल्यावरील काही कार्यालय ताब्यात घेत तेथुन प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

असे शिरले पाणी

बांधकाम सुरू असल्याने एसटीच्या विभागीय अभियंत्यांनी नियमाप्रमाणे बस स्थानकाला भेट दिली. बांधकामाची सद्य:स्थिती व दर्जाची तपासणी केली. 3 ऑगस्ट 2024 रोजी कंत्राटदाराला एक पत्रही अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. यात आरसीसी भिंत आणि टिनपत्रांच्या योग्य काळजी घेण्याची सूचना करण्यात आली होती. पावसाळ्याच्या दिवसात येथुन गळती होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतचे व अन्य कामांचा उल्लेख या पत्रात आहे. बस स्थानकात दुरूस्ती व बांधकाम सुरूच आहे. पावसाळा जवळपास संपला आहे. आकाश निरभ्र असते. त्यामुळे आरसीसी वॉल व टिनपत्रांचे काम करता येईल, असे कंत्राटदार व बांधकामावरील कर्मचाऱ्यांना वाटले.

कडक ऊन पडल्यानंतर त्यांनी आरसीसी वॉल व टिनपत्रांचे काम हाती घेतले. वॉटर प्रुफिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गळतीरोधी प्रणाली बसविण्यासाठी शिटवरील जोड उघडावे लागतात. कंत्राटदाराने हे सर्व जोड उघडले. तोपर्यंत सर्वकाही सुस्थितीत होते. परंतु अचानक हवामानाने कुस बदलली. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि मुसळधार पाऊस झाला. जोड उघडून ठेवण्यात आल्याने सहाजिकच पावसाचे पाणी बस स्थानकात शिरले.

Officer Transfer: अखेर आमदार राजू कारेमोरेंनी निपटविलेच

अधिकारी तातडीने पोहोचले

बस स्थानकात पावसाचे पाणी शिरल्याचे कळल्यानंतर काहींनी खोडसाळपणा करीत एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे नागपूरच्या एसटी महामंडळाचे कार्यकारी अभियंता 9 ऑक्टोबरला तातडीने नवीन बस स्थानकात पोहोचले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कानाकोपऱ्याची पाहणी केली. बांधकामाच्या दर्जाची पुन्हा खात्री केली. गळती निकृष्ट दर्जा आदीमुळे झालेली नाही. गळतीरोधी काम करण्यासाठी जोड उघडल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस झाल्याने झाल्याची वस्तुस्थिती पुढे आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी टॅग, वेळ आणि लोकेशनसह याचे फोटोच आता प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत उपस्थित होणाऱ्या सर्व शंका निराधार ठरल्या आहेत. चटके देणारं ऊन पडलं असताना घराचे छत दुरूस्तीसाठी उघडावे अन् कुठेच काही नसताना अचानक मुसळधार पाऊस कोसळावा तसाच हा प्रकार असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!