महाराष्ट्र

Assembly Election : नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Politics : प्रत्येकानं पुढाकार घेण्याचं केलं आवाहन

Polling Day : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. आहे. काळी सातपासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात दाखल होत त्यांनी महापालिका शाळा डीग दवाखाना, धरमपेठ केंद्रावर जात मतदान केलं.

देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, सर्वांनी मतदान आवश्य करावे. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो. जो मतदान करतो, त्याला त्या अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, असं वाटत असेल तर भरभरून मतदान करावं. फडणवीस पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आईसोबत मतदानासाठी आले होते.

विकासपुरूष कुटुंबासह

विकास पुरूष नावाने ओळख मिळविलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूर शहरातील महाल भागात मतदान केलं. टाऊन हॉल येथे सहपरिवार त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. सिंचन, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यंदा विकासाला मतदान करणार आहे, असे गडकरी म्हणाले. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गडकरी यांचे मतदान मध्य नागपूर विधानसभा मतदान मतदारसंघात येते. या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे. येथुन काँग्रेसकडून बंटी शेळके मैदानात आहेत. भाजपकडून विद्यमान विधान परिषद आमदार प्रवीण दटके लढतीत आहेत. रमेश पुणेकर हे अपक्ष उमेदवार आहेत.

Sudhir Mungantiwar : सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार सुधाकर कोहळे यांनीही मतदार केलं. पश्चिम नागपूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुधाकर कोहळे पश्चिम नागपूरचे उमेदवार आहेत. लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. विकासाचा मार्ग निवडावा असंही ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठी येथील महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्नीसह मतदान केलं. कामठी येथील नांदा गट ग्रामपंचायतमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले, ‘मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो. जनतेने बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकांकडून 100 टक्के मतदानाची अपेक्षा आहे. निवडून आलेले सरकार 14 कोटी जनतेसाठी काम करणार आहे.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!