महाराष्ट्र

Independents Ineffective : 15 वर्षांत अपक्षांची डाळ मतदारसंघात शिजलीच नाही

Jalgaon & Raver Constituency : जिल्ह्यात अपक्ष ठरले प्रभावहिन !

Loksabha Election : सध्या लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पार पडले. अनेक ठिकाणी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणा-या उमेदवारांचा फटका विजयाच्या दृष्टिक्षेपात असणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. जळगाव आणि रावेर या 2 मतदारसंघात मात्र गत 3 पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांना दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला मते मिळालेली नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. डॉ. उल्हास पाटील वगळता सर्वच उमेदवारांना 10 हजारांच्या आत मतदान मिळाल्याचे दिसून येते.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसला नाही. 2009 ते 2019 दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये अपक्षांनी उमेदवारी केली आहे. त्यात अनेकांचे डिपॉझिट जप्तही झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत अपक्षांची भाऊगर्दी होती. या निवडणुकीत रावेर आणि जळगाव मतदारसंघात 28 उमेदवार होते. त्यात एका अपक्षाला 20 हजारांवर मते मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीतही अपक्ष म्हणून जळगावमध्ये 20 तर रावेरमध्ये 10 जण उभे आहेत. अपक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेता एकाही अपक्षामुळे निवडणुकीच्या निकालावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा कितपत प्रभाव राहतो, ही बाब निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Bhandara Gondia Constituency : निवडणुकीचा उत्सव संपताच व्यवसायिकांची कमाई घटली 

जवळपास सर्वच अपक्षांची अनामत जप्त

आतापर्यंत सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपये तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये जमा करावे लागतात. कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 16.67 टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केले जाते. त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीतील 50 पैकी 46 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

सर्वाधिक मते डॉ. उल्हास पाटील यांना

डॉ. उल्हास पाटील यांनी 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना 21 हजार 332 मते मिळाली होती. गेल्या तीन निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मिळालेली ती सर्वाधिक मते ठरली. तर,

सर्वांत कमी मते 2014 मध्ये वंदना शिवाजी सोनवणे यांना ( 978) मिळाली होती. गेल्या तीन निवडणुकीतील अपक्षाला मिळालेली सर्वात कमी मते ठरली आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!