Assembly Election : भंडारा जिल्हातील लाखांदूरची राजकीय उपेक्षा सुरूच आहे.च्या शेवटच्या टोकावर असलेला लाखांदूर तालुका राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत असतो. अनेक राजकीय भूकंप देखील लाखांदुरातच घडले आहेत. असे असले तरीही विविध पक्षांकडून मात्र लाखांदूर तालुक्याची राजकीय उपेक्षाच झाली आहे. आजपर्यंत जेवढे ही महत्त्वाची राजकीय, पक्षाच्या स्तरावरील, संघटनात्मक पदे असो लाखांदूर तालुका कायम दुर्लक्षित ठेवण्यात आला. राजकीय व्यासपीठावर लाखांदूरची होणारी गळचेपी पक्षश्रेष्ठींबाबत असंतोष निर्माण करणारी आहे.
लाखांदूर साठी असे का?
राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक असो, कुठल्याही क्षेत्रात सुरळीत कामकाज चालविण्यासाठी विविध समित्या नेमण्यात येतात. या समित्यांमध्ये तालुका, जिल्हा, विधानसभा, लोकसभा, प्रदेश आदी स्तरांवर उपसमित्या स्थापन होतात. भंडारा जिल्ह्यातील विविध समित्यांच्या कार्यकारिणीत लाखांदूर वगळता इतर तालुक्यांना अध्यक्षपद दिले जात आहे. लाखांदूर तालुका उपेक्षित असल्याची कुजबूज मतदारांमध्ये होत आहे. तसेच याचे थेट परिणामही आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे.
या कार्यकारिणीत अध्यक्षपद मुख्य असते. अनेकदा ही मुख्य जबाबदारी लाखांदूर तालुक्याकडे येणार, असे भाकीत वर्तवले जाते. तरी बहुतांश समित्यांची मुख्य जबाबदारी साकोलीकडे दिली जाते. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीत मुख्य पदापासून लाखांदूर तालुका उपेक्षितच असल्याची वास्तविकता आहे.
लाभ साकोलीचा
दूसरीकडे साकोली विधानसभा निवडणुकीत साकोली आणि लाखनी या तालुक्यांमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये फारसा अंतर नसतो. मात्र, निर्णायक ठरतो तो लाखांदूर तालुका. त्यामुळे या तालुक्यावर राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मताधिक्य मिळविण्यासाठी विशेष लक्ष ठेवून असतात. मागील विधानसभेत लाखांदूर तालुक्यानेच आमदार निवडून दिल्याचा जनमत आहे. असे असले तरी विविध जिल्हास्तरीय कार्यकारिणी पुनर्गठित करताना अध्यक्षपद मात्र साकोलीला दिला जात आहे. त्यामुळे आमदार निवडून द्यायचा लाखांदूरने, लाभ मात्र साकोलीलाच असा जनमत येत आहे.
Tractor Allocation Scheme : आदिवासी परिषदेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
विधानसभेत फटका
साकोली विधानसभेचे विद्यमान आणि या आधीचे आमदारही साकोली तालुक्याचे आहेत. याव्यतिरिक्त बहुतांश जिल्हा कमिटीचे अध्यक्षस्थान साकोली तालुक्याला देण्यात आले. त्यामुळे लाखांदूर तालुक्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणारे किंवा पुढाकार घेणारे नेते किंवा पुढारी नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, लाखांदूर तालुक्यात विधानसभेचा साधा उमेदवारही दिला जात नसल्याची शोकांतिका तालुकावासींकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे वेळीच राजकीय पक्षांनी या बांबीवर लक्ष न दिल्यास लाखांदूर वासियांचा संताप विधानसभा निवडणुकीत दिसू शकतो यात शंका नाही.