महाराष्ट्र

Kangana Ranaut : चंदीगढ विमानतळावर, खासदाराला दिली झापड गालावर

Chandigarh : दिल्लीला जात असताना घटना ‘हा’ प्रकार

BJP हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री तथा भाजप कंगना रनौत यांचा विजय झाला आहे. 6 मे रोजी कंगना रनौत दिल्लीसाठी रवाना होत असताना त्यांच्यासोबत एक खळबळ जनक प्रकार घडला आहे. कंगना रनौत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाल्या असता, एका सीआयएसएफ महिला शिपाईने कंगना रनौत यांना कानशिलात लगावली.

काय घडला नेमका प्रकार..

शेतकरी आंदोलनाविरोधात कंगना रनौत यांनी वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केलेल्या विरोधामुळे सीआयएसएफ महीला गार्ड रागावली होती. म्हणून, कंगना रनौत यांना कानशिलात लगावली, अशी माहिती आहे. कॉन्स्टेबल कुलविंदर कौर असे त्या महिला गार्डचे नाव आहे.

ही घटना 6 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. कंगना राणौत चंदीगड येथून दिल्लीला जात असताना सीआयएसएफ महिला शिपाई कुलविंदर कौर हिने हे कृत्य केले आहे. कंगना राणौत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात बोलल्यानने CISF गार्ड रागावलेल्या होत्या, असा दावा केला जात आहे. कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर कंगनाने पोलिसांकडे तक्रार केली होती. ती विमानाने दिल्लीला रवाना झाली आहे.

Buldhana Constituency : जाधव, खेडकरांच्या लढतीत अपक्ष तुपकर किंगमेकर..

हिमाचल प्रदेशच्या चार लोकसभा जागांपैकी मंडी लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत उतरल्या होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत कंगनाचा दमदार विजय झाला असून त्या मंडीमधून खासदार झाल्या आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!