महाराष्ट्र

Gondia Constituency : कोदामेडीचे उपसरपंच भिवगडे पायउतार

Gram panchayat : आठ विरूध्द शून्य मताने अविश्वास प्रस्ताव पारित

Political war : गोंदिया जिल्हाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथील उपसरपंच प्रवीण तेजराम भिवगडे यांना पायउतार व्हावे लागले. त्यांचा मनमर्जी कारभार भोवला असून आठ विरूध्द शून्य मताने अविश्वास प्रस्ताव पारित झाला. या राजकीय घडामोडीमुळे गावात एकच खळबळ उडाली.

सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्राम पंचायतीमध्ये 9 सदस्य संख्या आहे. उपसरपंच पदावर कार्यरत प्रवीण तेजराम भिवगडे हे स्वमर्जीने काम करतात. कोणत्याही सदस्याला विश्वासात घेत नाही. अशी तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. यावरून 29 एप्रिल रोजी ग्राम पंचायत सदस्यांची अविश्वास प्रस्तावाला घेऊन सभा बोलविण्यात आली होती. सभेत उपसरपंच अनुपस्थित राहिले. दरम्यान अविश्वास प्रस्तावाला सभेत उपस्थित असलेल्या सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी एकमताने पारित केले.

Lok Sabha Election : विदर्भातील निवडणूक आटोपली आता नेत्यांचा उर्वरित महाराष्ट्रात प्रचार 

अविश्वास प्रस्ताव सभेत सरपंच विनोद पुसाम, ग्रा. पं. सदस्य रामदास भिवगडे, निशांत राऊत, अंजुम खान, सुलोचना मुनिश्वर, कामिनी चांदेवार, रोशनी शेलार, कुसूम तरोणे यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने मत दिले. यामुळे उपसरपंच प्रवीण भिवगडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. विशेष म्हणजे, या सभेसाठी ग्राम पंचायत परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

यंदाचे वर्ष भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पायउतार होणारे वर्ष ठरले आहे.भंडारा जिल्ह्यात 22 ग्रामपंचायत सदस्य- सरपंच- उपसरपंच पायउतार झाले आहे.तर गोंदिया जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!