BJP : ईशान्य भारतात सत्तेची कल्पनाही नसताना भाजपाला सलग तिनदा सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होत आहेत. 2016 पासून मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेणारे खांडू यांना भाजपाचा ईशान्येत मार्ग सुकर करणारे किंगमेकर म्हणून ओळखले जाते. पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. 13 जून रोजी पेमा खांडू राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा हे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इटानगरला पोहोचले आहेत. 12 जून बुधवारी येथे झालेल्या बैठकीत खांडू यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग सहभागी झाले होते.
सत्ताधारी भाजपने 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकल्या होत्या, तर एनपीपीने 5, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने (पीपीए) 2 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस एका जागेवर तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या.
कोण आहेत पेमा खांडू?
क्रीडा आणि संगीतप्रेमी पेमा खांडू, गेल्या काही वर्षांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एक मोठा नेता म्हणून उदयास आला आहे. विशेषत: 2016 मधील घटनात्मक संकटानंतर ज्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. कुशल निवडणूक रणननीतीकार म्हणून आपली प्रतिमा उभी करण्यात खांडू यशस्वी ठरले. त्यांच्या रणनीतीमुळे त्यांनी या ईशान्येकडील राज्यात भाजपचे नेतृत्व आणले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आणि 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकून बहुमत मिळवले.
Pune Hit and Run : आरोपीला सोडले अन् मृतकाच्या व्हिसेरामध्ये अल्कोहोल टाकले !
37व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने तुकी सरकार पुन्हा स्थापन झाले. परंतू तुकी यांनी लवकर राजीनामा दिला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी खांडू जुलै 2016 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. चीनच्या सीमेला लागून असलेल्या या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून, खांडू आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने दोनदा पक्ष बदलले आहेत. काँग्रेस ते अरुणाचल प्रदेश (पीपीए) आणि नंतर भाजप, तेही केवळ पाच दिवसांच्या अंतराने असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्या कार्यकाळाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर सत्ताधारी काँग्रेसचे 43 आमदार भाजपचा मित्रपक्ष पीपीएमध्ये सामील झाले होते. 2019 मध्ये पेमा खांडू ‘मुक्तो’ या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आणि कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय मुख्यमंत्री बनले.