गुवाहाटीची ‘झाडी… डोंगर आणि हाटील’ आजही कुणी विसरलेले नाही. आता पुन्हा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने याच्या पुनरावृत्तीचा धसका राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे हॉटेलच्या एकाज मजल्यावर सर्व आमदारांना ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्हीची करडी ठेवण्यात आली आहे.
12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीने 8 ऐवजी 9 उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडून सर्व 9 उमेदवार जिंकून आणणार, असा दावा देखील केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकून यावे, यासाठी महाविकास आघाडीकडून खरबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या सर्व 16 आमदारांना आज परेल येथील आयटीसी ग्रँड हॉटेल येथे बोलावलं आहे. याच हॉटेलमध्ये कालपासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आमदारांना ठेवलं जात आहे. त्यांच्यावर सीसीटीव्हीची निगराणी राखली जात आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या 11 जागांसाठी एकुण 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत कुणाचा उमेदवार पडणार त्यासाठी कुणाचं राजकारण सरस ठरणार, याची रणनिती आतापासूनच ठरू लागली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राज्यात सत्तांतर घडून आलं होतं. आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे रंगत वाढली आहे. विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
या निवडणुकीत भाजपने उमेदवार पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार भावना गवळी, कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजी गर्जे, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा घोषित केला आहे.
9वा उमेदवार निर्णायक!
यामध्ये महाविकास आघाडीकडे सध्याच्या घडीला पुरेसं संख्याबळ आहे. पण महायुतीने 9वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीने वेगळा टर्न घेतला आहे. महायुतीच्या एका उमेदवारामुळे या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
हॉटेलमध्ये मुक्काम
ठाकरे गटाने या निवडणुकीत आपल्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी जिंकून यावं, तसेच मविआचे इतर दोन उमेदवार जिंकून यावेत, यासाठी ठाकरे गटाकडून काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या सर्व 16 आमदारांना आज परेल येथील आयटीसी ग्रँड हॉटेल येथे बोलावलं आहे. याच हॉटेलमध्ये कालपासून १२ जुलैपर्यंत आमदारांना ठेवलं जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे मुंबई पदवीधर निवडणुकीत जिंकून आल्याने त्यांच्याकडून सर्व आमदारांसाठी याच हॉटेलमध्ये आज रात्री स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.