Supreme Court : काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) च्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा प्रचंड मतांनी पराभव करून ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
सिब्बल यांनी दोन दशकांनंतर ही निवडणूक लढवली होती. त्यांनी आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा 377 मतांनी पराभव केला आहे. त्यांच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना लोकशाहीसाठी लढत राहण्यास सांगितले आहे. कपिल सिब्बल यांनी 8 मे रोजी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) च्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती.
कोर्टरुम मध्ये राजकारण नको
सिब्बल यांनी माध्यमांना सांगितले होते की, निवडून आल्यास, अत्यंत अस्थिर राजकीय खटल्यांचा कोर्टरूममध्ये निर्णय घेतला जातो. तेव्हा कोर्टरूममध्ये राजकारण आणले जाणार नाही, याची खात्री करण्याचा त्यांचा हेतू आहे.
EVM Security : ‘स्ट्राँग रुम’च्या सुरक्षेमुळे ‘परिंदा भी पर नहीं मारता’
आमची विचारधारा भारतीय राज्यघटना
कायद्याचे राज्य राखणे आणि नागरिकांचे राज्याच्या अतिरेकांपासून संरक्षण करणे. वकील कशासाठी आहे ? जगाच्या इतिहासातील प्रत्येक सरकार नेहमी कायद्याने दिलेले अधिकार ओलांडते. आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वकील आहेत. ही एकच विचारधारा आहे आणि त्यात राजकारण आणावे असे मला वाटत नाही. मी ते कधीच आणले नाही. असे होणार नाही याची खात्री करण्याचा माझा हेतू आहे असे कपिल सिब्बल म्हणाले.