Angry Protest : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर केला. धानोरकर यांच्या या भाषेमुळे संतप्त झालेल्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी धानोरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. धानोरकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत हे आंदोलन करण्यात आले. खासदार धानोरकर या महिला आहेत. त्यातही त्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे सुसंस्कृतपणा ज्यांनी जपायला हवा होता, असे यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी म्हणाल्या.
एखाद्या नेत्याचा एकेरी उल्लेख करायचा आणि चुकीच्या शब्दांचा वापर करायचा हे सुसभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृतपणा आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्या व्यक्तीचे लक्षणच नाही, असा संताप यावेळी आंदोलन करणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा (Warora) येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांना सहभाग घेतला.
आता बॅनरवर फटके..
आंदोलनात सहभागी झालेल्या भाजपच्या सुनिता काकडे, माया राजूरकर, कीर्ती कातोरे, शुभांगी निंबाळकर, सुजाता दुर्गपुरोहित, ज्योती मुंजे, ज्योती कित्ते, छाया चव्हाण यांनीही धानोरकर यांच्या कृतीचा निषेध केला. धानोरकर यांनी आपल्या भाषेत सुधारणा करावी. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि कतृत्वाने मोठ्या असलेल्या वडिधारी व्यक्तीबद्दल आपण असेच बोलतो का? असा सवालही या महिलांनी केला. यानंतरही धानोरकर यांनी अशा भाषेचा वापर केल्यास आता फक्त बॅनरला फटके मारले आहेत, भविष्यात काय होईल, याचा विचार त्यांना करावा, असा इशारा देण्यात आला. यापुढे धानोरकर यांच्या विरोधातील आंदोलन तीव्र होत जाईल, असेही सांगण्यात आले.
Pratibha Dhanorkar : ताई तुमचाच वापर करून चोरले ‘लाडक्या बहिणी’चे नाव
संताप व्यक्त
जिल्हाभरात निषेध व्यक्त करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यासंदर्भात संताप व्यक्त केला. आमदार म्हणून आपल्या कार्यकाळ सुरू केल्यापासून सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधक असो की समर्थक कोणातही भेद केला नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात विरोधी पक्षातील नेते आजही सन्मानाने बोलतात. त्यांच्या कामाचा आवाका, अभ्यास यामुळे विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेरही त्यांच्याकडे सगळेच लोकप्रतिनिधी आदराने पाहतात. विधिमंडळातील सर्वोकृष्ट नेत्यांपैकी मुनगंटीवार एक आहेत. अगदी विरोधातील विरोधी नेत्यांनीही अशी भाषा कधी वापरलेली नाही. परंतु प्रतिभा धानोरकर यांनी आता सर्वच लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा निर्धार केलेला दिसत असल्याची टीका आंदोलनाच्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रपूर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील नागरिकहीनाराज आहेत.