महाराष्ट्र

Jitendra Awhad : स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाड ‘हे’ काय करून बसले ?

Amol Mitkari : गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आज आक्रमक झाले. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड महाडमध्ये दाखल झाले. चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन आंदोलन सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. स्टंटबाजीच्या नादात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले, असा आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झाले. मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्यासाठीच आज (ता. 29) दुपारी ते महाडमध्ये दाखल झाले.

महाडमधील चवदार तळ्याजवळ त्यांनी मनुस्मृतीचे दहन आंदोलन केले आहे. चवदार तळ्याजवळ जाण्यापूर्वी आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबियांची भेटदेखील घेतली. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केला आहे. मिटकरी यांनी ‘स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला, हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध असल्याचं मिटकरी म्हणाले. तर आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी असेही ते म्हणाले.

Bhandara Gondia : भंडारा-गोंदियाकरांचे मतदान सुरक्षित ठेवण्यासाठी 75 जवानांचा वाँच !

नेमकं काय म्हणाले मिटकरी?

डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना मिटकरी म्हणाले की, स्टंटबाजीच्या नादात आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. ही फार मोठी चूक आहे. स्टंटबाजी करीत असताना आव्हाड यांना इतकी ही गोष्ट ध्यानात येऊ नये? पोस्टर फाडत असताना आपण बाबासाहेब यांचा फोटो फाडत आहोत, हे त्यांना कळले कसे नाही? ही चूक अक्षम्य असल्याचं मिटकरी म्हणाले. या घटनेचा आपण निषेध करीत आहोत.

ज्या आव्हाडांनी फोटो फाडून हा राष्ट्राचा अवमान केला. त्याबद्दल आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 24 तासाच्या आत त्यांनी नाक घासून माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार मिटकरी यांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!