महाराष्ट्र

Amravati Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशासकीय प्रक्रियेला वेग, यंदा होणार प्रवेशाला सुरुवात ? 

Lok Sabha Election : आचारसंहितेमुळे राजकीय हस्तक्षेपही कमी

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यावर्षीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया व महाविद्यालयाच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या तात्पुरत्या पायाभूत सुविधा जिल्हा सामान्य रूग्णालय (इर्विन) मध्येच उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.

प्रस्तावित महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. अनिल बत्रा यांची आधीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याच नेतृत्वात महाविद्यालयाच्या अनुषंगाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. १०० विद्यार्थी क्षमता व ४३० खाटांचे रूग्णालय मिळून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर मार्गावरील आलियाबाद येथील जागा निश्चित झाली आहे. तरी तिथे सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत बांधण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे; मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रकिया 2024-25 या शैक्षणिक सत्रापासूनच सुरू करण्यात येणार आहे.

त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रामुख्याने जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) व सुपर स्पेशालिटीच्या आवारातील इमारतींचा वापर करण्यात येणार आहे. आगामी जून ते जुलै महिन्या दरम्यान इयत्ता बारावी व ‘नीट’ परीक्षेचा निकाल लागल्यावर वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी दोन अडीच महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.दरम्यान, आचारसंहितेमुळे राजकीय हस्तक्षेपही कमी झाल्याने प्रशासनाकडून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

Lok Sabha Election : धावपट्टीच नसल्याने मनसेचे ‘इंजिन’कुठपर्यंत ओढणार राणांची गाडी?

लवकरच आयसीयू

इर्विनमधील वॉर्ड क्रमांक आठमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने नुकताच वॉर्ड आठमधील रूग्णांना इतर वॉर्डात हलविण्यात आले आहे. इर्विनमध्ये सद्यस्थितीत सहा खाटांचाच अतिदक्षता विभाग असून, आता तो २० खाटांचा होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) डॉ. दिलीप सौंदळे यांचे कार्यालय इर्विन रूग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदर इमारतीची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. इर्विनमधील सीएसच्या कार्यालयाच्या जागी 50 खाटांचे स्त्री प्रसुती रूग्णालय प्रस्तावित आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!