संपादकीय

Lok Sabha Election : विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे भवितव्य काय ?

Vidarbha Region Politics : नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस याच दोन पक्षांत सातत्याने लढत होत आली आहे

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भाचे मतदान पार पडले. आता अंदाज, आराखडे लावले जात आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यामध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस आमनेसामने बघायला मिळाली. कारण पूर्व विदर्भात तरी शिवसेना (दोन्ही गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (दोन्ही गट) फारसे अस्तित्व सध्या दिसत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांसाठी फार जागा सोडतील, असे वाटत नाही. अर्थात चार जूननंतर हे अधिक स्पष्टपणे सांगता येईल.

लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा किती झाला, याची आकडेवारी सध्या गोळा केली जात आहे. प्रत्यक्षात एक टक्क्यावर कोणालाही फायदा झाला नाही. हा प्रारंभिक निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत युती, आघाडीचे काही खरे नसल्याचे बोलले जात आहे.

थेट लढत

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस याच दोन पक्षांत सातत्याने लढत होत आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसे स्थान नाही. आता तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे जी काही ताकद होती. ही ताकद सुद्धा विभागल्या गेली आहे. शिवसेना-भाजप युती असताना सेनेला नागपूर जिल्ह्यात विधानसभेत स्थान दिले जात होते.

रामटेकचा अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार इतर मतदारसंघातून जिंकून आला नाही. त्यामुळे एक-एक जागा त्यांच्याकडून घेणे भाजपने सुरू केले. नागपूर शहरात पूर्व नागपूर, मध्य नागपूर सुरुवातीला शिवसेनेकडे होते. युतीमार्फत शिवसेनेच्या उमेदवारांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवली. पूर्व नागपूरमध्ये शिवसेनेचे प्रवीण बरडे आणि शेखर सावरबांधे यांचा विजय थोडक्यात हुकला होता.

भाजपने पूर्व नागपूर आपल्याकडे घेऊन दक्षिण सेनेला सोडले. युती तुटल्यानंतर शिवसेना आणखीच कमजोर झाली. सध्या नागपूर शहरातील भाजप आणि काँग्रेसची राजकीय परिस्थिती बघता आगामी विधानसभेत शिवसेना व राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्यात येतील, याची सुतराम शक्यता नाही. लोकसभेच्या निकालानंतर हे अधिकच स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election : राऊतांनी शिवसेना, तर जितेंद्र आव्हाडांनी घेतली तुतारी गट संपवण्याची जबाबदारी !

भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिंदे सेनेचे शहर प्रमुख सुरज गोजे प्रामुख्याने प्रचारात सहभागी झाले होते. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी प्रचार केला.

इतरही छोटेमोठे पक्ष युती व आघाडीसोबत होते. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना याचा कितपत फायदा झाला, हे निकालानंतरच प्रत्यक्ष समोर येणार आहे. त्याकरिता बुथनिहाय मतदानाची आकडेवारी सर्वच पक्षांकडे उपलब्ध आहे. त्याचा आधार घेऊन आकडेमोड केली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!