महाराष्ट्र

Shiv Sena : काळजाचे घाव कधी भरत नसतात

Prakash Ambedkar : आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

Political war : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका असे विधान वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होते. त्यावर बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, शरीरावरचे घाव बुजतात. मात्र,हृदयावर झालेले घाव कधीच बुजत नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी एकत्र होण्याची शक्यता नाही. त्यांच्या तूर्तास या शब्दावरून पुढे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा कयास लावला जातोय.

देशभरातील राजकारणावर बाईट देऊन नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे लोकसभा निवडणुकीपासून सध्या शांत आहेत. त्यांचे कुठलेच स्टेटमेंट गाजलेले नाही. निवडणूक संपताच त्यांनी राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया दिली.

आंबेडकर राजकीय तज्ञ पण..

ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे तज्ज्ञ आहेत. पण, सद्यस्थितीत असे होईल असं वाटत नाही. कारण तसे होण्याची वेळ आता निघून गेली आहे. ज्यावेळेस पक्ष फुटले होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंकडून ज्या रिएक्शन्स होत्या त्या असह्य होत्या.

Sudhir Mungantiwar : मायावी विचार घेऊन लोकशाहीचे हरण करण्याचा ‘महाविकास’चा प्रयत्न !

 प्रकाश आंबेडकर हेच ते विधान..

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समझोता झाला आहे. त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघात नूरा कुस्ती सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात. असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. उल्हासनगर येथील सभेत ते बोलत होते. दोन्ही शिवसेना लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी परिस्थिती आहे, असे आंबेडकर यांनी प्रचारसभेत बोलताना म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळातच चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!