महाराष्ट्र

Lok Sabha Election :  युवक काँग्रेसला बदनाम करण्याचे कर्तृत्वहिनांचे षडयंत्र

Cospiracy  : पहिली नोटीस प्रदेश अध्यक्षांना द्यायला हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी

Congress News : विदर्भातील एकूण 49 युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यामुळे नेमका घर का भेदी कोण ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कर्तव्यात कसूर झाल्यास अशा नोटिस पाठवल्या जातात. मात्र, कधी याची बातमी झाल्याचे ऐकिवात नाही. नोटिस काढून सदर यादी माध्यमांना देऊन युवक काँग्रेसची बदनामी करणारे कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.यामागे षडयंत्र असल्याची युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भावना आहे.

खरंतर ज्या संदर्भाने नोटीस बजावली गेली त्याचा कुठेही नीट उल्लेख नाही. तसेच सदर पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी काम केले असे भासविण्याचा संघटनेतील कोणाचा उद्देश ? असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे.

ज्या 49 पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला त्यातील अनेकजण काँग्रेसमध्येच राहिले आहेत. काहींनी आपल्या सामाजिक, राजकीय वाटचालीची सुरुवात काँग्रेसपासून केली आहे. मात्र भेदभाव करत राजकीय सूडबुद्धीने आकस ठेवून कारवाई केल्याची पदाधिकाऱ्यांची भावना झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जो नियम इतरांना तो प्रदेश अध्यक्ष यांना का नाही ? संघटनेत विधानसभा अध्यक्षांपासून ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्वांना समान नियम आहे. त्यांनी देखील या संदर्भाने कुठलेच काम केले नसताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई का नाही ? दुसऱ्या बाजूला प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव यांना नोटीस पाठवली गेली. असे ? या विरोधात पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे धाव घेतल्याचे समजते.

Lok Sabha Election : शिवानी वडेट्टीवार यांना युवक काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात येणार?

कारणे दाखवा नोटीस बजावण्यापूर्वी निवडणूक काळात केलेल्या कामाचा रिपोर्ट मागायचा असतो. त्याने समाधान न झाल्यास मग कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची संघटनेची पद्धत आहे. मात्र,या ठिकाणी राजकीय आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने पदाधिका-यांनी संबंधितांविरोधात दिल्लीतील वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
निवडणूक काळात विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या अनेक जबाबदाऱ्या घेतल्या होत्या. सभा, कॉर्नर मीटिंग, दौरे नियोजन, महिला तसेच युवकांची सभेसाठी उपस्थिती वाढविण्याचे काम आदी. यासह अन्य गोष्टी ज्या निवडून येण्यासाठी महत्त्वाच्या आणि गरजेच्या समजल्या जातात. त्यात वेळ दिल्यामुळे अनेकांना संघटनेने दिलेले काही कामे करता आली नाही. याचा अर्थ त्यांनी कामेच केली नाही, म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस काढणे हे काढणाऱ्या वरिष्ठांचा संकुचित विचार असल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नोटीस बजावलेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याशी संपर्क साधला आहे. आणि काँग्रेस पक्ष आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी नोटीस काढणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!