प्रशासन

Home Department : गोंदिया कारागृहाचा चेंडू आता पोलिस बोर्डाकडे

Long Await : एक दशकापासून टोलवाटोलवी; निर्मितीच्या हालचाली थंडावल्या

Ignore Vidarbha : गोंदिया जिल्ह्याचा व्याप मोठा आहे. भंडारा येथील केंद्रीय कारागृहाची क्षमता लक्षात कमी आहे. त्यामुळे गोंदियात बंदी कारागृह उभारण्याच्या हालचाली 2011-12 मध्ये सुरू झाल्या. कारागृहाचा प्रस्तावही तयार झाला. मात्र दहा वर्षांपासून कारागृहाचा विषय निव्वळ गटांगळ्या खात आहे. सरकारच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हा विषय फिरत आहे. त्यामुळे सुरू होण्यापूर्वीच कारागृहाची अवस्था खराव झाली आहे. एकंदरीत कारागृह निर्मितीच्या हालचाली थंडावल्याचेच दिसत आहे. त्याकडे नेते मंडळीनेदेखील दुर्लक्ष केले आहे. गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे, हे उल्लेखनीय.

गोंदियातून अनेक बंदी भंडाऱ्याला पाठविले जाते. यासाठी पोलिस बळ आणि पैसाही खर्च होतो. आरोपी अधिक किंवा अट्टल गुन्हेगार असल्यास वाहन, पोलिस ताफ्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. त्यातच संधी साधून कैदी पळून जाण्याची भितीही असते. गेल्या काळात अशा घटनादेखील घडल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता गोंदियात कारागृहाची निर्मिती आवश्यक आहे. शासनाने 2011- 12 मध्ये गोंदियात वर्ग एकचे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

शोधाशोध कायम

कारागृहासाठी जागा पाहण्याच्या हालचाली झाल्या. तत्कालीन कारागृह अधीक्षक बदलून गेल्याने प्रस्ताव पडून राहिला. कालांतराने राज्य सरकारच्या नगररचना विभागाने गोंदियात वर्ग दोनच्या कारागृहाला मंजुरी दिली. जागेचा शोध घेण्याचे पत्र काढले. त्यानुसार जागेची पाहणी झाली. पोलिस मुख्यालय परिसरात जिल्हा कारागृह निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बांधकाम अंदाजपत्रक आराखडा तयार झाला. इमारत बांधकामासाठी खर्चाचा अहवाल राज्य सरकारने मागविला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. 300 कैद्यांची क्षमता असलेले कारागृह निर्माण होणार होते.

IPS Lohit Matani : सर..आता हे सगळं कोण पाहणार?

कधी मिळेल कारागृह

आता दशकभराचा काळ लोटूनही गोंदियाला कारागृह मिळू शकले नाही. यासाठी तत्कालीन शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडले असावे, असेच म्हणावे लागेल. गोंदिया येथे कारागृह नसल्याने येथील कैद्यांना भंडारा कारागृहात पाठविले जाते. तेथील कारागृहाची क्षमता 350 कैद्यांची आहे. सद्य:स्थितीत या कारागृहात 400 पेक्षा अधिक कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या 550 पेक्षा आसपास होती. विशेष म्हणजे, सद्य:स्थितीत 250 पेक्षा अधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गोंदियात जिल्हा कारागृह होणे गरजेचे आहे. भंडारा कारागृहावर सातत्याने अतिरिक्त भार पडत आहे. भंडाऱ्यातून गोंदियाला बंदीवानांना दर महिन्याला कोर्टात पेशीवर आणावे लागते. त्यात वेळ, श्रम, पैसा देखील खर्च होतो. गोंदियात कारागृह झाल्यास या सर्वांची बचत होणार आहे. त्यामुळे येथे कारागृह गरजेचे आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!