महाराष्ट्र

Lok Sabha Election : बापरे… 1.07 कोटी मते कशी वाढली ?

Manipulation : ईव्हीएम बदलल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप 

EVM Tampering : लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकड्यांवरून मोठा वाद सुरू आहे. मतदानाच्या टक्केवारीत छेडछाड केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. निवडणूक आयोगाच्या 5 टप्प्यातील ताज्या आकडेवारीत 1.07 कोटी मतांची वाढ झाली आहे, ज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. 

देशात मतदानानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याबद्दल असोसिएशन फॉर ‘डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ संस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवले आहे. ईव्हीएम बदलली असल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आयोगाकडून 24 मेपर्यंत उत्तर मागवले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सदर याचिका सुनावणीसाठी आली आहे. असोसिएशन फॉर ‘डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ‘ने मागणी केली होती की, न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत की मतदान संपल्याच्या 48 तासांच्या आत मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करावी. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ही आकडेवारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आयोगाला अडचण काय आहे ? यावर आयोगाच्या वकिलांनी म्हटले होते की बरीच माहिती गोळा करून ती अपलोड करण्यासाठी वेळ लागतो.

याचिकेत काय म्हटले

दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीची अंदाजित आकडेवारी निवडणूक आयोगाने 30 एप्रिल रोजी जाहीर केली होती. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 11 दिवसांनी आणि 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर चार दिवसांनी निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या 30 एप्रिलच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मतदानाच्या टक्केवारीत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवडणूक आयोगाचे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की,निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एडीआरचे वकील प्रशांत भूषण यांच्या सगळ्या शंकांचे निरसन केले आहे. त्यांनी असे म्हटले की,या याचिका निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठीचा प्रयत्न आहे. सिंग यांनी हे देखील सांगितले की मतदानाचे आतापर्यंतचे सगळे टप्पे सुरळीतपणे पार पडले आहेत.

Bangladesh MP : बांगलाच्या बेपत्ता खासदाराची कोलकात्यात संशयास्पद हत्या !

1.07 कोटी मतांची वाढ

निवडणूक आयोगाच्या 4 टप्प्यातील मतदानात 1.07 कोटी मतांची वाढ दिसून आली आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी रात्री उशीरा निवडणूक आयोगाने आकडे जारी केले होते. ते आकडे आणि अंतिम अद्ययावत आकड्यांमध्ये 1.07 कोटी मतांचा फरक आहे. 379 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले असून या प्रत्येक मतदारसंघातील मतदानाचा आकडा सरासरी 28 हजाराने वाढला.

आकडेवारी मध्ये तफावत

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली अंतिम आकडेवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशीरा जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा थोडी वेगळी आहे. अनेक राज्यांमध्ये मतदानाच्या रात्री जारी करण्यात आलेल्या आकड्यांपेक्षा अंतिम आकडे वेगळे होते. मतदानाच्या रात्री प्रसिद्ध करण्यात आलेले आकडे आणि अद्ययावत आकडेवारीत फरक आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 18.6 लाख, दुसऱ्या टप्प्यात 32.2 लाख, तिसऱ्या टप्प्यात 22.1 लाख आणि चौथ्या टप्प्यात 33.9 लाख मतांचा फरक होता. अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक दिवस लागले आणि मागील लोकसभा निवडणुकांप्रमाणे प्रत्येक टप्प्यानंतर नेमकी किती मते पडली हे जाहीर केले नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याचा इन्कार केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!