महाराष्ट्र

Buldhana Constituency : अर्ज मागे घेतला तरी शिंदे ठरले वरचढ 

BJP : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण मिळवत स्वतःला केले सिद्ध 

BJP & Shiv Sena : बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं युद्ध आता शांत झाल आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. बंडखोरीचे चित्र निर्माण करणाऱ्या विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावणं यातच त्यांचा विजय सिद्ध झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा शहरामध्ये संजय गायकवाड विरुद्ध विजयराज शिंदे हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. विजयराज शिंदे यांच्यावर यापूर्वी हल्लाही झाला होता. त्यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय गायकवाड हे वाटेल तसं बोलतात, असा आरोप शिंदे यांनी केला. हा आरोप पूर्णपणे वस्तुस्थितीला धरून आहे.

तोंडाला येईल ते..

संजय गायकवाड हे मनाला वाटेल तसं बोलत राहतात. कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहीर टीका केली. कोविडचे विषाणू सापडले तर आपण ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबू, असे विधान गायकवाड यांनी केले होते. संजय गायकवाड यांचे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी वादही आहेत.

भाजपच्या आमदाराला शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. गायकवाड यांच्या बेलगाम जिभेला आवर घडण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचे विजयराज शिंदे यांनी हेरले. त्यामुळे त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने ही सुरुवातीला त्याला विरोध केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदे यांना चर्चेसाठी बोलावणं आलं.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेत संजय गायकवाड यांच्या विरोधात शिंदे आणि भाजपच्या सर्वच नेत्यांनी ठाम पुरावे शिंदे यांच्यासमोर सादर केले. विजयराज शिंदे यांनी आपल्या उमेदवारीबद्दल भाष्य करताना भाषेची कोणतीही मर्यादा ओलांडली नाही. उलट संजय गायकवाड यांनीच शिंदे यांचा बाप काढला. त्यामुळे सगळ्यांनीच गायकवाड ही कशी उद्धटपणा करतात ही बाब एकनाथ शिंदे यांना पटवून दिली. हाती सत्ता असली की माणसाचे पाय जमिनीवर राहात नाहीत.

सत्ता गेली की अशा माणसाला कोणीही विचारत नाही. उलट त्याचे सगळे शत्रू एकाच वेळी सक्रिय होतात. अशीच परिस्थिती गायकवाड यांची होऊ नये, असा सल्ला वजा इशारा भाजपकडून देण्यात आला. त्यामुळे विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून योग्य तो दिलासा मिळाला आहे.

Nagpur MNC : गडकरी म्हणाले, ‘महापालिकेचे कंत्राटदार मोठ्ठे बदमाश’!

विजयराज शिंदे ही चिल्लर केस आहे, असा दावा संजय गायकवाड यांनी केला. मात्र खरंच शिंदे चिल्लर केस असती तर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं असतं का? अशी चर्चा आता बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. परिणामी बंडखोरीच्या या खेळीतून शिंदे यांनी राजकीय वर्तुळातील आपलं अस्तित्व आणि आपलं महत्त्व पटवून दिलं आहे.

संजय गायकवाड यांच्यामुळे दुखावलेले बुलढाणा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते सध्या योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहेत. योग्य वेळी गायकवाड यांचे हे सर्व विरोधक करेक्ट कार्यक्रम करतील आणि त्यांना वरिष्ठ पातळीवरूनही पाठिंबा मिळेल यात शंकाच नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!