Political War : सभागृहातील चर्चा असो की लोकसभा निवडणुकीचा प्रचार वैयक्तिक हेत्वारोपावर भर दिला जातो. ही निवडणूक त्याला अपवाद राहिली नाही. मुख्य मुद्दे बाजूला राहतात आणि नाॅन इश्यूज चर्चेचा विषय बनतात. परंतु काही उमेदवारांनी याबाबत साधन शुचिता पाळलेली दिसते.
संजय राऊत यांनी टाकला मिठाचा खडा
राजकारणात कोणी कोणाचा सदैव मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. तसेच सध्याच्या तोडफोडीच्या राजकारणात तर काहीच सांगता येत नाही. अशा स्थितीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्या विषयी अपशब्द वापरले. त्यामुळे उद्रेक झाला. राऊत यांना जुना हिशेब चुकता करायचा होता परंतु त्यासाठी वेगळी भाषा वापरता आली असती परंतु तसे झाले नाही. एका महिला विषयी आपण काय बोलून गेलो याची सारवासारव देखील त्यांनी केली नाही.
पाहून घेण्याची भाषा
देशाची सर्वात मोठी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जाताना विकासाच्या मुद्यांवर भर देण्याऐवजी राजकीय नेते एकमेकांवर हेत्वारोप करण्यात धन्यता मानतात. every thing is fair in love, war and politics अशी समज करून घेऊन काही नेते वावरतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राजकीय दृष्ट्या आम्ही किती प्रगल्भ झालो हे दिसून येते.
नितीन गडकरी यांचे वेगळेपण
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे याबाबत वेगळेपण दिसून येते. निवडणुकीच्या गदारोळात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, नितीनजी गडकरी कोणावर वैयक्तिक टीका करत नाहीत. उलट विरोधकांकडून काही घेण्यासारखे असल्यास ते जरुर घ्या असे त्यांचे म्हणणे असते. खरोखर गडकरी यांनी यासंदर्भात आदर्श घालून दिला आहे हे विरोधक देखील मान्य करतील.
Lok Sabha Electiion : मोटाभाई अकोल्यात घालणार हिंदुत्वाच्या मुद्द्यांना हात
जगण्याचे मुद्दे बाजूला पडू नये
महागाई, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी यांना अनेक समस्या आहेत. कोविड नंतर औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तो सुसह्य व्हावा याला प्राधान्य दिले जावे ही सामान्य माणसाची किमान अपेक्षा आहे. त्याचा आवाज प्रचारात दबू नये हे तो सांगू पाहत आहे.