Women & Child Development Department : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांनीही या योजनेवरून सरकार निशाणा साधला. दुसरीकडे लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. जुलै महिन्यांत अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झालेत. आता महिलांना प्रश्न पडला की, ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. अशातच राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून 21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेला राज्यात सर्वसामान्य महिलांकडून चांगला उदंड मिळत आहे. योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार, अशी विचारणा होत आहे. त्यावर मंत्री तटकरे यांनी भाष्य केले.
Vijay Wadettiwar : सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे आश्चर्य नाही
अटी शिथिल
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशपेक्षाही जास्त चर्चेत आहे. जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जुलैमध्ये या योजनेचे बरीच चर्चा मिळविली. योजनेसाठी अर्ज भरताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. सरकारने कालांतराने योजनेतील काही अटी शिथिल केल्या. सरकारने अर्ज प्रणाली ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरुपात केली. त्यावरूनही राजकारण रंगले. त्यांनतर अनेक महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल केले. त्यांना 14 ऑगस्टपासून पैसे मिळाले.
जुलैनंतरही अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे सरकार अद्यापही महिलांचे अर्ज स्वीकारत आहे. जुलै महिन्यात महिलांना दोन महिल्यांचे पैसे मिळाले. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या बँक खात्यात वळते झालेत. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये केलेल्या अर्जांचे पैसे महिलांच्या खात्यात याच महिन्यात जमा होणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात अर्जांबाबत अदिती तटकरे म्हणाल्या की, माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये पाठविण्यात येणार आहेत. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील. ही रक्कमही दोन महिन्यांची असेल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.