महाराष्ट्र

Lok Sabha Election : भावना गवळी अद्यापही नाराज

Yavatmal - Washim Constituency : भावना गवळींची सामंत यांच्याकडून मनधरणी!

Yavatmal – Washim constituency : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापल्याने त्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे. भावना गवळी आणि त्यांचे समर्थक हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत नाही. त्यामुळे नाराज असलेल्या भावना गवळी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत हे आज रिसोड येथील खासदार भावना गवळी यांच्या घरी दाखल झाले. त्यांच्याकडून भावना गवळी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून शिवसेना शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनाच नव्हे तर सर्वांनाच धक्का बसला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ येथे हजर असतानाही गवळी मात्र दूरच राहिल्या. भावना गवळी या अद्यापही नाराज असल्याचं बोलले जातं आहे. मागील 25 वर्षांपासून खासदार भावना गवळी यवतमाळ मधून निवडून येत आहेत. मागील तीन टर्मचा विचार करता त्या भरघोस मतांनी जिंकून येत आहेत. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापल्याने भावना गवळी यांची पक्ष नाराजी दूर करणार का, त्यांचे पुनर्वसन होणार का, त्या काय भूमिका घेणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

मनधरणी साठी उदय सामंत दाखल!

प्रचारापासून दूर असलेल्या भावना गवळी यांची मनधरणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे रिसोड येथे आज खासदार भावना गवळी यांच्या घरी दाखल झाले. आहेत. उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारापासूनही भावना गवळी आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप दूर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत खा. गवळींची मनधरणी करण्यात यशस्वी होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. भावना गवळींच्या उमेदवारीचा फटका बसू नये म्हणून हे प्रयत्न करण्यात येत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!