महाराष्ट्र

Rail Force One : पंतप्रधान मोदी करणार दहा तासांचा रेल्वे प्रवास!

Narendra Modi : पोलंडनंतर युक्रेनची राजधानी किव्हला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत. पोलंड-भारत द्विपक्षीय संबंधाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते पोलंड येथे दाखल झाले आहेत. गेल्या 45 वर्षांत पोलंड दौरा करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ते प्रथमच या देशात गेले आहेत. त्यानंतर ते युक्रेन दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी 10 तासांचा रेल्वेचा प्रवास करणार आहेत.

युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून ते उक्रेनला जाणार आहेत. युद्धामुळे तेथील हवाई मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. आणि रस्त्याच्या मार्गाने प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी पोलंड ते युक्रेनची राजधानी किव्ह असा प्रवास ” रेल फोर्स वन “ने करणार आहेत. रेल्वेगाडीतून तब्बल दहा तासांचा प्रवास करून ते पोहोचतील.

रेल फोर्स वन काय आहे?

2014 मध्ये किव्ह मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल फोर्स वन गाडी तयार करण्यात आली होती. युद्धाच्या नंतर तेथील हवाई मार्ग बंद करण्यात आले. अशावेळी युक्रेनमध्ये रेल्वे मार्गाने होणारा प्रवास हा सगळ्यात सुरक्षित मानला जातोय. रेल फोर्स वन ही डिझेल इंजिनवर धावणारी गाडी आहे. रेल फोर्स वन हा शब्द आयरन डिप्लोमसीचे प्रतिनिधित्व करतो. हा शब्द युक्रेनच्या रेल्वे सीईओ अलेक्झांडर कमिशन द्वारा देण्यात आलेला आहे. युद्धानंतर रेल्वे मार्ग हा तेथील एक कुटनितिक राज मार्ग झालेला आहे.

दिग्गजांनी केलाय प्रवास

रेल फोर्स वनच्या माध्यमातून आजपर्यंत फ्रान्सचे राष्ट्रपती ईमॅन्युअल मॅक्रो, जर्मनीचे चान्सलर ओलॉफ शोल्तस , अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेत्यांनीही प्रवास केलेला आहे .

अशी आहे ट्रेन 

या ट्रेनमध्ये उच्चस्तरीय बैठकीसाठी एक मोठा टेबल, आलिशान सोफा आणि एक मोठा एलईडी टीव्ही सुद्धा आहे. शिवाय विश्रांतीसाठी आरामदायक अशी व्यवस्था सुद्धा आहे. खास मान्यवर नेत्यांच्या प्रवासासाठी एका वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली ही एक लक्झरी ट्रेन आहे. जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी एक युक्रेनचे आहे. ते तब्बल पंचवीस हजार किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे.

 45 वर्षांत प्रथमच

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. तिथून ते 23 ऑगस्टला युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आणि याच दौऱ्यामध्ये किव्ह ला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल दहा तासांचा रेल्वे प्रवास करणार आहेत. भारत आणि पोलंडच्या राजकीय संबंधांना 70 वर्षे पूर्ण झालेले असून त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंडला गेलेले आहेत. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान हे पोलंडला गेले आहेत हे विशेषत्वाने येथे नमूद करावेसे वाटते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!