महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : मतदान प्रक्रियेवर उमेदवाराला आली शंका !

Ravikant Tupkar : मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा

Buldhana constituency : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येईल, याचा निकाल उडत्या 4 जूनला लागणार आहे. मशाल, पाना की, धनुष्यबाण? अशी तिरंगी लढत झाली.परंतु मतदानाच्या अचानक वाढलेल्या टक्केवारीवर अनेक मोठ्या नेत्यांनी शंका व्यक्त केली. आता अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीही शेवटच्या एका तासात वाढलेल्या टक्केवारीवर कटाक्ष टाकला आहे.

त्यांनी स्पष्टपणे शंका उपस्थित केली नसली तरी शेवटच्या एका तासात 10 टक्क्याची आकडेवारी महत्वपूर्ण आहे. या संपूर्ण मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवले पाहिजे. जेणेकरून मतदान प्रक्रियेची वैधता सिद्ध होईल, असे आवाहनहसुद्धा तुपकर यांनी केले आहे. त्यामुळे एकंदरीत प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या गेल्याने येणाऱ्या काळात तुपकरांकडून हाच मुद्दा आंदोलनाचा राहू शकतो असे संकेत मिळत आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे.

मतदान नि:पक्षपातीपणे, मोकळ्या वातावरणात व कायदेशीरपणे पार पडते किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ही 50 ते 55 टक्के पर्यंत होती. मात्र अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारी मध्ये आकस्मिकपणे दहा टक्क्यांची वाढ झालेली आहे.

Maharashtra Lok Sabha Election : विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही म्हणताच, ऊर्जामंत्र्यांच्या सभेत बत्ती गुल!

त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेट्या सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्व मतदान केंद्रांमध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे ते जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!