महाराष्ट्र

Death Threat : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ!

Ajit Pawar : गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क

Increase in Security : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत गेल्या दोन दिवसांपासून वाढ करण्यात आली आहे. अजित पवार हे सध्या मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्यांनतर पोलिसांनी अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे.

राज्यात काही दिवसांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

अजितदादा जनतेचे सेवक आहेत. अशा पोकळ धमक्या नेहमी येत असतात. या असल्या धमक्यांना घाबरून किंवा त्याची चिंता करण्यापेक्षा जनतेचा सन्मान करण्यासाठी हा आमचा दौरा सुरू रोहिल. आमची ही यात्रा बंद होणार नाही, असंही मंत्री अनिल पाटील म्हणाले.

माजी आमदाराची घेतली भेट 

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने काल मालेगावमध्ये अजित पवार हे यांनी माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने अजित पवार चाचपणी करणार आहेत. अल्पसंख्याक समाज लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)पासून दूर गेल्याने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न दौऱ्यात सुरू आहे. यावेळी माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचे चेकिंग करुन पोलिसांनी खात्री देखील केली आहे. या भेटीनंतर अजित पवार धुळे आणि अमळनेरच्या दौऱ्यावर आहेत. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार हे आज त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

Sanjay Raut : सुपारी घेऊन मातोश्रीपुढे आंदोलन

जनसन्मान यात्रा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढीत आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!