महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha : मतदानापूर्वी जळगाव प्रशासनाने ‘त्यांना’ हाकलले

Will they Vote: हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी ?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन व पोलिस दलाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. उपद्रवींना आळा बसावा म्हणून जळगाव जिल्ह्यातून 18 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार झालेल्यांना मतदान करायचे असल्यास आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यात येण्यासाठी दोन तास सूट दिली जाते. आचारसंहिता लागल्यापासून प्रशासन व पोलिस दल सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासह कोठेही गैरप्रकार होऊ नये, याकडे लक्ष दिले जात आहे.

रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात शांतता राहण्यासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या 18 गुन्हेगारांना निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. मात्र हद्दपार असलेल्या या गुन्हेगारांना मतदान करण्याची मुभा असणार आहे.

18 गुन्हेगार हद्दपार

हद्दपार करण्यात आलेल्या 18 जणांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली. एसपींनी तीन टोळ्यांवर व प्रांताधिकाऱ्यांनी नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

13 मे रोजी मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होऊन आवश्यक टप्पे पार पडले. आता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

Thane Lok Sabha : एका शिवसेनेच्या म्हस्केंना धनुष्यबाण तर दुसऱ्याच्या विचारेंना मशाल

हद्दपार गुन्हेगारांना देखील मतदानाचा अधिकार

देशाच्या राजकारणात, आपले प्रतिनिधित्व कोण करणार हे ठरविण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केला आहे. राज्यघटनेचे कलम 19(1) (अ) आणि 326 तसेच 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 62 (5), 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार प्रदान करतात. हद्दपार गुन्हेगारांना देखील मतदान करण्याची परवानगी मिळते. अशा आरोपींना मतदानाच्या दिवशी विशिष्ट कालमर्यादेत त्याचे ज्या मतदान यादीत नाव असेल, तेथे मतदान करण्यास मुभा आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!