महाराष्ट्र

Buldhana Constituency : बुलढाण्याचा कौल कुणाला? गायकवाड, तुपकर की शेळके ?

Assembly Elections : गायकवाडांचा विकास फसवा असल्याचा विरोधकांचा आरोप

Sanjay Gaikwad : नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आता कामाला लागलेले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच राजकीय जाणकारांचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदार कुणाला कौल देणार आणि कुणाला दूर लोटणार, याबाबत आता राजकीय विश्लेषक गणिते मांडत आहेत. 

सर्वच पक्ष सक्रीय 

या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जयश्री शेळके, शेतकरी नेते रविकांत तुपकर की उद्धव ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल अडीच लाख मते घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा सध्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जोरात आहे.

या मतदारसंघात आमदार संजय गायकवाड, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, रविकांत तुपकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील मतदार शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतात. त्यामुळेच विजयराज शिंदे यांच्यासारखा अल्पसंख्यांक समाजातील नेता या मतदारसंघातून आमदार होऊ शकला होता.

विजयराज शिंदे हे 1995, 2009 आणि 2004 असे सलग तीनवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीतदेखील संजय गायकवाड हे शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. परंतु, त्यांना विजयराज शिंदे यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीचा फायदा झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी हर्षवर्धन सपकाळ यांना फटका बसला होता. आमदार गायकवाड यांना 67 हजार 785 मते तर विजयराज शिंदे यांना द्वितीय क्रमांकाची 41 हजार 710 मते मिळाली होती. हर्षवर्धन सपकाळ यांना 31 हजार 316 मते मिळाली होती.

दलित व ओबीसी मते विजयराज शिंदे यांच्याकडे वळल्याने काँग्रेसचे सपकाळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये 3 लाख 6 हजार 272 मतदार होते. त्यांपैकी 58.51 टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे 26 हजार 75 मतांनी संजय गायकवाड यांनी विजय प्राप्त केला होता. या मतदारसंघात संजय गायकवाड यांच्या बुलढाणा शहरातील विकासकामांचा बोलबाला आहे. असे असले तरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जोरदार हवा तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीतही तुपकरांनी 39 हजार मतांचा लीड येथून घेतला होता. तुपकरांची ही लाट आजही कायम असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Sanjay Gaikwad : गायकवाड, बोंडे आणि राणे ठरताहेत महायुतीची डोकेदुखी ?

मतदारसंघ कोणासाठी आहे सुरक्षित ? 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. इतर मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल, अशी राजकीय परिस्थिती आहे. तथापि, बुलढाणा मतदारसंघातून मात्र रविकांत तुपकर हे फाईटमध्ये असतील, असे राजकीय धुरिणांचे मत आहे.

फसवा असल्याचा आरोप

संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. पण हा विकास फसवा असल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांनी चालविला आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या जयश्री शेळके मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेस पक्षाला जर हा मतदारसंघ सुटला तर शेळके उम्मेदवार असतील. असे झाले तर या मतदारसंघात चमत्कार होऊ शकतो. काँग्रेसकडून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा पक्षाकडे येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!