Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान
Uttar Pradesh : मनेका गांधी, निरहुआ यांच्यासह दिग्गज निवडणूक रिंगणात
In Sixth phase of Lok Sabha Election Nations Big guns in the Contest mg63 mc97
Lok Sabha Voting सार्वत्रिक निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 14 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, तृणमूल काँग्रेसचे ललितेश पती त्रिपाठी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता दिनेशलाल यादव निरहुआ यांच्यासह 162 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
राज्यातील या 14 जागांवर लोकसभा निवडणुकी सोबतच बलरामपूरच्या गासडी विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकीसाठी 25 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, 25 मे रोजी होणारे मतदान सुरक्षित, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावे यासाठी मतदान पथके शुक्रवारी मतदानाच्या ठिकाणी रवाना होतील.
यूपीच्या या जागांवर मतदान..
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, सहाव्या टप्प्यात राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. त्यात सुलतानपूर, प्रतापगढ, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकरनगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज आझमगढ, जौनपूर, मच्छिल्लानगर, भदोही आणि विधानसभा उप मतदारसंघ गानसडी येथे मतदान होणार आहे. त्यापैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. 146 पुरुष आणि 16 महिलांसह एकूण 162 उमेदवार 14 लोकसभेच्या जागांसाठी रिंगणात आहेत, तर सात उमेदवार गासडी विधानसभा जागेवरून निवडणूक लढवत आहेत. सुलतानपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मनेका गांधी यांचा सामना समाजवादी पक्षाचे रामभुआल निषाद आणि बहुजन समाज पक्षाचे उदयराज वर्मा यांच्याशी आहे.
सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातील लढत रंजक बनली आहे. येथे मनेका गांधी पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.