प्रशासन

Buldhana : सिंदखेड राजामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त!

Assembly Election : मलकापुरात सर्वांत कमी; सात विधानसभा मतदारसंघांत १० लाखांवर संख्या

Female Voting percentage : विधानसभा निवडणुकचीच्या तोंडावर राज्य सरकारने 1200 हून अधिक शासन निर्णय जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक लाडकी बहिण योजना चर्चेमध्ये आहे. याच योजनेच्या माध्यमातून आगाऊ हप्ते महायुती सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिला मतदार वर्ग लाडकी बहीण योजना डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास महायुतीमधील नेत्यांमध्ये आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघांमधील महिला कोणाला कौल देणार? याची उत्सुकता असेल.

बुलढाणा जिल्ह्यात सातही मतदारसंघांत १० लाख १८ हजार ९९६ महिला मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक महिला मतदार या सिदंखेड राजा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात १ लाख ५३ हजार ३९९ महिला मतदार आहेत. तसेच, जिल्ह्यात सर्वात कमी महिला मतदार मलकापूर मतदारसंघात आहेत, मलकापूरमध्ये १ लाख ३७ हजार ७५६ महिला मतदारांचा समावेश आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला मतदारांचीही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. महिला मतदारांकडून मतदानाचा टक्का वाढल्यास निवडणुकीच्या निकालावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. 

निवडणूक विभागाकडून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची एकूण आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ लाख २४ हजार २२७ एकूण मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ५ हजार १९३ पुरुष, तर १० लाख १८ हजार ९९६ मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता राज्यातील लाडक्या बहिणी कोणाच्या पारड्यात मतं टाकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजीच मिळणार आहे.

Assembly Election : तर पक्षाचे दरवाजे कायमचे बंद!

जय्यत तयारी 

जिल्ह्यात सात मतदारसंघ जिल्ह्यात मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद हे सात मतदारसंघ आहेत. सातही मतदारसंघात ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. त्याची निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सिंदखेड राजात मतदार सर्वाधिक 

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार सिंदखेड राजा मतदारसंघात आहेत. या मतदार संघात एकूण ३ लाख २१ हजार ११५ मतदार असून यामध्ये १ लाख ५३ हजार ३९९महिला मतदार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!