Shiv Sena : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडीत नक्कीच काही तरी बिनसलं आहे, हे स्पष्ट होतं. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे चर्चेसाठी समोर आहेत. काही जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरला आहे. पारनेर, हडपसरच्या जागेवर चर्चा सुरू आहे, असे अंधारे म्हणाल्या.
रामटेकमध्ये काँग्रेसला जागा हवी होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ती जागा सोडली. शिवसेनेने शब्दही काढला नाही. यात बोलण्यासारखं काही साठी नाही. तेथुन आघाडीचा खासदार विजयी झाला आहे. शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवत ही माघार स्वीकारली. निवडणुकीत व्यापक प्रचार सुद्धा केला. कॉंग्रेस उमेदवारांसाठी काम केलं. म्हणून विजय मिळाल असं त्या म्हणाल्या. सांगलीतील अनुभव हा वेदनादायी आहे. तो विसरणं कठीण आहे. सांगलीबद्दल विचार करावा लागेल असेही अंधारे यांनी नमूद केले.
संयम गरजेचा
शिवसेना नेते संजय राऊत काही जागांबाबत आग्रही आहेत. त्याला कारणही तसे आहे. त्या मतदारसंघात शिवसेनेची शक्ती आहे. कामठी, रामटेकमध्ये क्षमता आहे. ती जागा शिवसेना जागत आहे. दर्यापूर, बडनेरा, वाशीम येथेही शिवसेनेची ताकद आहे. या ठिकाणी विनिंग आमदार होते. आता शिवसेनाही सर्वेक्षण करीत आहे. शिवसेना काही बाबतीत दोन पावले मागे सरकेल. अन्य पक्षांनीही ही समजदारी दाखवावी, असं अंधारे म्हणाल्या. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे मोठे नेते आहेत. ते शिवसेनेची भावना समजून घेतील. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा चेहरा महत्वाचा आहे. अगदी तसाच उद्धव ठाकरे यांचाचेहराही महत्वाचा आहे. शरद पवार यांचा विश्वासक चेहरा आहे, असे अंधारे म्हणाल्या.
मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी काम करावे अशी इच्छा आहे. प्रचारसभा ताकदीने करण्याची आपली इच्छा आहे. बापू पठारे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. पण पक्षाकडे चांगले चेहरे आहेत. त्यामुळे हडपसर मागत आहोत. कोथरूड मागत आहोत. बारामतीची जागा मागितलेली नाही आहे. कदाचित पिंपरी सुटण्याची चिन्हे आहे, असे अंधारे यांनी सांगितले. कोणालाही वाटेल मेहनत आपण केली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी जागा आपल्याला मिळावी. जास्त ताकद आहे असे काही ठिकणी वाटते. पक्षाचे पदाधिकारी तसे रिपोर्ट पाठवतात. अनिल देसाई हे त्याबाबत भूमिका मांडतात. त्यामुळे संजय राऊत हे पक्षाच्या हिताचे निर्णय घेतील, घेतात आणि तसे बोलतात, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.
दर्यापुरात ताकद
बळवंत वानखेडे हे अमादर होते. आता ते खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो असा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल पेटविण्यासाठी मदत करू, असे ते बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्या समोर हे बोलणे झाले होते. कामठी दमदार विधानसभा आहे. पश्चिममध्ये वातावरण चांगल आहे. संपर्क नेते भास्कर जाधव ते काम सांभाळत आहेत. बडनेरा, दर्यापूरबद्दल आपल्याला माहिती असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात खेळी सुरू आहे. आदित्य ठाकरे हे वाघ आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे चांगले चेहरे आहेत. भाजपने आपली अवस्था बघावी, असा टोला सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. विनोद तावडे यांनी एक फोटो पोस्ट केला. त्यात जे. पी. नड्डा हात जोडत आहेत. त्यातून देवेंद्र फडणवीस आणि आपली पत किती आहे, हे लक्षात येतं असं त्या भाजपला म्हणाल्या.
योग्य निर्णय
महाविकास आघाडीत जागा वाटपाची बोलणी अनिल देसाई आणि संजय राऊत करीत आहेत. आपल्याकडे प्रचाराची जबाबदारी आहे. नाना पटोलेना यांचे वरिष्ठ आपण नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणार नाही, असंही अंधारे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात आहे. महाराष्ट्र भाजपच्या मालकाची सीट धोक्यात असल्याचे अनेक सर्वेक्षण सांगत आहेत. शिवसेनेच्या वाटायला दक्षिण पश्चिम आल्यास तेथे नक्की लढणार असल्याचं अंधारे म्हणाल्या. यापूर्वी पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबरला झाला होता. यंदा भाजपचा निकालही 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.