महाराष्ट्र

Girish Mahajan : गडकरींमुळे देशातील पर्यटन वाढले

Nitin Gadkari : गिरीश महाजनांनी दिले श्रेय; पर्यटनात देणार विदर्भाला झुकते माप

Tourism Department :  नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी देशातील पर्यटनवाढीचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले. ‘नितीन गडकरी यांच्‍या प्रयत्‍नांमुळे केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील रस्‍ते चांगले झाले. त्यामुळे पर्यटनाला प्रोत्‍साहन मिळाले,’ असंही ते म्हणाले.

खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्‍यावतीने आयोजित ‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ च्‍या समारोपीय सत्रात ते बोलत होते. ‘पर्यटन धोरण – 2024’ हे देशातील सर्वोत्‍तम धोरण आहे. यात ऐतिहासिक, सांस्‍कृतिक, वन, समुद्र, धार्मिक, मेडीकल, साहसी पर्यटनाला चालना देण्‍याचा प्रयत्‍न केला गेला आहे. त्‍यात विदर्भाला झुकते माप कसे देता येईल याचा अधिकाधिक प्रयत्‍न आहे. हे धोरण महाराष्‍ट्राला देशात आघाडीवर नेणारे ठरेल, असा विश्‍वास महाजन यांनी व्‍यक्‍त केला.

यावेळी हॉटेल सेंटर पॉइंटचे व्‍यवस्‍थापकीय संचालक जसबीरसिंह अरोरा, हॉटेल अशोकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक संजय गुप्‍ता, एनआरएचएचे अध्‍यक्ष व एआयडीच्‍या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे संयोजक तेजिंदर सिंग रेणू, आदींची उपस्थिती होती. ‘रामाच्‍या गावाला जाऊया’ या अभिनव प्रकल्‍पाच्‍या लोगोचे अनावरण गडकरी व गिरीश महाजन यांच्‍या हस्‍ते झाले.

रोजगार मिळावा हा उद्देश

पर्यटन म्‍हणजे केवळ आर्थिक स्‍त्रोतांची निर्मिती नाही. त्‍यातून लाखो लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देश आहे. अशिक्ष‍ितांपासून ते उच्‍च शिक्षितांपर्यंत सर्वांना रोजगार उपलब्‍ध करून देणारे हे क्षेत्र आहे. त्‍यांनी ‘आईट योजनेद्वारे महिला पर्यटनालाही प्रोत्‍साहन देण्‍यात येत असल्‍याचे सां‍गितले.

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘हा तर निर्लज्यतेचा कहर आहे’

गडकरी म्हणाले, ‘विदर्भात क्षमता आहेत’

विदर्भात पर्यटनाच्या दृष्टीने खूप क्षमता आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. ताडोबा, उमरेड, पेंचमुळे टायगर कॅपिटल म्हणून आपली ओळख आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना द्यायची असेल तर आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

जगातील सर्वोत्तम पर्यटन धोरण

महाराष्‍ट्राने जगातले सर्वात उत्‍तम पर्यटन धोरण आणल्‍याबद्दल गिरीश महाजन यांचे गडकरींनी अभिनंदन केले. त्याचवेळी पर्यटकांना महाराष्‍ट्रात आकर्षित करण्‍यासाठी अभिनव कल्‍पना राबवाव्‍या, असे आवाहन केले. ‘महाराष्‍ट्रातले 75 टक्‍के जंगल विदर्भात असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. प्रत्‍येक गेटवर गाड्यांच्‍या संख्‍येला मर्यादा घातल्‍यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सफारीसाठी आता वापरण्‍यात येत असलेल्‍या इलेक्‍ट्रीक गाड्यांमुळे ध्‍वनी व वायू प्रदूषण कमी होणार आहे. त्‍यामुळे गाड्यांची संख्‍या तीनपटीने वाढवल्‍यास, पर्यटकांची संख्‍या वाढेल व रोजगारही वाढेल, असेही गडकरी म्‍हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!