महाराष्ट्र

Lok Sabha Election : अरे देवा ! लग्न सोहळ्यात चर्चा फक्त निवडणुकीची

Election Discussion : हा उमेदवार पुढे तो मागे, यावर रंगतोय फड

Bhandara Gondia Constituency : लग्न सोहळा म्हटले की,कौटुंबिक आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील नातेवाईक सहभागी होतात. त्यामुळे सोहळ्यात आपापल्या लोकसभा मतदारसंघात रणसंग्रामासह झालेले मतदान आणि मतदारांचा कौल यावर चांगलीच चर्चा रंगत आहे. 

एकीकडे सनई-चौघडा वाजत असतो आणि दुसरीकडे पाहुणे मंडळी निवडणुकीच्या चर्चेत दंग असतात. अगदी नवदांपत्याला आशीर्वाद देताना सवड मिळाली की कोणता उमेदवार पुढे,कोण मागे या विषयी चर्चा पाहायला मिळत आहे.

पहिल्या चरणातील मतदान 19 एप्रिल रोजी झाले. भंडारा- गोंदिया मतदारसंघातील 18 तर गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील 10 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार याचा अंदाज लावून मतदार सुध्दा एकमेकांशी विचारणा करून समीकरण जुळवू लागले आहे. ‘आमच्याकडे पंजा चालला तर तुमच्याकडे कमळ चालले असे म्हणत आता जिंकणार कोण? असा प्रश्न उपस्थित करून चर्चा करू लागले आहेत.

Amit Shah in Bhandara : भाजपने नव्हे, तर पुत्रप्रेमाने फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी !

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून खासदार निवडण्यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 10 लाखांवर मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारातच थेट व चुरशीची लढत झाली. मतदारांनी देखील इतर पक्षासह अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे पंजा आणि कमळ या दोन्ही बोध चिन्हावरच मतदाना नंतर चर्चा होत आहे.

भंडारा जिल्ह्यात पंजाची चर्चा तर, गोंदियात कमळ!

19 एप्रिलच्या मतदाना नंतर उमेदवारांच्या भवितव्याची चर्चा रंगू लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी पुढे तर, गोंदिया व तिरोडा या दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार पुढे राहणार असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहावयास मिळाली. यामुळे दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांकडून दावे-प्रतिदावे होत आहेत. तरी, मतदार देखील दोन, पाच हजाराच्या मताधिक्यांची तफावत राहणार असे बोलत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात अपक्ष व इतर पक्षाचे उमेदवार किती मते घेणार यावर मताधिक्याची मदार राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यातील मतदारांच्या पसंतीवर अवलंबून राहणार हे निश्चीत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!