Election Mode : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये जो उमेदवार अधिक मतदार नोंदणी करतो त्याला निवडणूक अधिक सोपी जाते हे नेहमीच अनुभवास येते. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ जुलैला संपत आहे.
विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी होईल.
PM Narendra Modi : चारसौ पार की राहुलचे सरकार; भेंडवळकडे साऱ्यांचे लक्ष
कोणत्या चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार?
विलास पोतनीस – शिवसेना ठाकरे गट (मुंबई पदवीधर), कपिल पाटील – लोकभारती (मुंबई शिक्षक), निरंजन डावखरे – भाजप (कोकण पदवीधर), किशोर दराडे – अपक्ष ( नाशिक शिक्षक)