महाराष्ट्र

Hit And Run Case : पुण्यानंतर आता जळगाव ‘हिट अँड रन’ केसची चर्चा

Crime News : बिल्डर अन् राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या मुलाला 18 दिवसांनी घेतले ताब्यात

Crime News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण देशात गाजत असताना जळगावात देखील अशीच घटना समोर आली. आले होते. पुणे आणि जळगाव दोन्ही केसमध्ये बिल्डरचे कनेक्शन आहे. जळगाव येथील हिट अँड रन केसमध्ये एकाच कुटुंबातल्या 4 जणांचे बळी गेले होते. या प्रकरणात बिल्डर अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांच्या मुलाला 18 दिवसानंतर ताब्यात घेतले आहे.

7 मे 2024 रोजी जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे भरधाव वेगाने कार चालवून दोघांनी एकाच कुटुंबातल्या चौघांचे बळी घेतले. कारमध्ये असलेले दोघेजण बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हे होते. हे दोघेही अपघातात जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली. आरोपींना 27 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभूत आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयासमोर आज कामकाज झाले. सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात युक्तिवाद झाला. दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Sand Mafia : वाळू माफिया विरोधात जिल्हाधिकारी डॉ. पाटील ‘ऑन स्पाॅट’

या प्रकरणात पोलिसांनी अर्णव कौल आणि अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांवर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्यावर याआधी कलम 304 आणि एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या केसमध्येही राजकीय दबाव !

पुण्याच्या पोर्श कार अपघात प्रकरणात राजकीय दबावाचे आरोप झाले. तसेच राजकीय दबावातून जळगावची गंभीर केस दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांनाही ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनंतर जळगावच्या केसमध्ये पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूत्रे ताब्यात घेऊन तपासाला दिशा दिली. त्यामुळे आता पुढे काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!